#MPSC_EXAM_Date : लोकसेवा आयोगाने परीक्षेची नवीन तारीख केली जाहीर
राज्यात कोरोना रुग्ण संखेत वाढ होत असल्याने येत्या रविवारी होणारी एमपीएससीकडून घेण्यात येणारी नियोजित राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर काल राज्यभरात विद्यार्थ्यांचा संताप पाहायला मिळाला. आता लोकसेवा आयोगाने परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली आहे.
लोकसेवा आयोगाने काढलेल्या नवीन परिपत्रकानुसार 21 मार्चनंतर होणाऱ्या परीक्षा या ठरलेल्या वेळेनुसारच होणार आहेत. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 27 मार्चला होणार आहे. तर 11 एप्रिलला महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट- ब संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे.