Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#MaharashtraCoronaUpdate :  आज राज्यात १४ हजार ३१७ नवीन  कोरोना रुग्ण

Spread the love

कोरोनाची आजची आकडेवारीत मोठी रुग्णवाढ झाल्याचे दिसत आहे. राज्यात आज तब्बल १४ हजारांवर नवीन कोरोना बाधितांची भर पडली आहे. त्यामुळे महाराष्ट्र लॉकडाऊनच्या आणखी जवळ जात असल्याचे संकेत मिळू लागले आहेत.

राज्यात आज ५७ करोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून आतापर्यंत ५२ हजार ६६७ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील करोना मृत्यूदर २.३२% एवढा आहे. आज राज्यात १४ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे तर त्याचवेळी ७ हजार १९३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण २१ लाख ६ हजार ४०० करोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.९४% एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ७२ लाख १३ हजार ३१२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २२ लाख ६६ हजार ३७४ (१३.१७%) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४ लाख ८० हजार ८३ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर ४ हजार ७१९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

तसेच, राज्यातील करोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाखांच्या वर गेली असून, आजच्या आकडेवारीनुसार राज्यात १ लाख ६ हजार ७० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यात पुणे जिल्ह्यात तब्बल २१ हजार २७६ रुग्णांवर सध्या उपचार सुरू असून नागपूर जिल्ह्यात हा आकडा १३ हजार ८०० इतका झाला आहे. ठाणे जिल्ह्यात १० हजार ८२४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर मुंबई पालिका हद्दीतील अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडाही १० हजारांचा टप्पा ओलांडून आता १० हजार ५६३ इतका झाला आहे. नागपूर पालिका हद्दीत आज करोनाचे १ हजार ७०१ नवे रुग्ण आढळले आहे. पुणे पालिका हद्दीत १ हजार ५१४ तर मुंबईत १ हजार ५०९ नवीन रुग्णांची भर पडली असून या तिन्ही प्रमुख शहरात कोरोनाचा धोका सर्वाधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

#AurangabadCoronaUpdate : जिल्ह्यात 902 नवे रुग्ण, 49890 कोरोनामुक्त, 4131 रुग्णांवर उपचार सुरू

 

एमपीएससीच्या प्रमुखांनी तारखांचा घोळ मिटवून उद्याच तारीख जाहीर करा : उद्धव ठाकरे

 

12 मार्च मध्यरात्री पासून नांदेड जिल्ह्यात अंशतः लॉकडाऊन

रत्नागिरी जिल्ह्यासाठी शिमगोत्सवासाठी नियमावली जाहीर

12 मार्च मध्यरात्री पासून नांदेड जिल्ह्यात अंशतः लॉकडाऊन

आपलं सरकार

Click to listen highlighted text!