Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पत्नीचा खून करणार्‍या मजूराची जन्मठेप खंडपीठात कायम

Spread the love

औरंगाबाद – चारित्र्याच्या संशयावरुन मद्यधूंद अवस्थेत पत्नीचा लाकडी दांड्याने आठ वर्षापूर्वी खून करणार्‍या मजूराची जन्मठेपेची शिक्षा न्यायमूर्ती रविंद्र घूगे आणि न्या.बी.यू. डेबडवार यांच्या खंडपीठाने कायम केली आहे.

लातूर येथे बांधकाम साईटवर सुरक्षारक्षक म्हणून काम करणार्‍या संजय नामदेव गायकवाड(५२) याने त्याची पत्नी उमा हिला लाकडी दांड्याने शरीरावर बावीस ठिकाणी मारहाण करुन ८जूलै २०१३मधे दारुच्या नशेत खून केला होता. संजय आणि उमा यांना दोन मुली आणि दोन मुले आहेत. संजय आणि उमा संजय चे वडिल नामदेव गायकवाड यांनाही सोबंत घेऊन राहात होते.दोन्ही मुली विवाहित असून एक लातूरमधेच राहते. संजय गायकवाड च्या मारहाणीला कंटाळून संजय चे वडील नामदेव आणि मुलगा आकाश परभणीला निघून गेले होते. संजय चा लहान मुलगा विकास हा या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस निरीक्षक राजकुमार सोनवणे यांनी तपासपूर्ण करुन आरोपी विरोधात लातूर जिल्हान्यायालयात आरोपपत्र दाखल केले असता.लातूर न्यायालयाने आरोपी संजय गायकवाड ला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाला आरोपी संजय गायकवाड ने खंडपीठात आव्हान दिल्यानंतर न्या.घुगे आणि न्या. डेबडवार यांनी आरोपीचा मुलगा विकास, विवाहित मुलगी शिला, शवविच्छेदन करणारे डाॅ.उंबरे, आणि पोलिस निरीक्षक राजकुमार सोनवणे यांच्या पुन्हा साक्षी घेतल्या.वरील निरीक्षणानंतर खंडपीठाने आरोपी संजय गायकवाड ची शिक्षा कायम केली आहे. वरील प्रकरणात आरोपी तर्फे अॅड. एम.ए.तांदळे यांनी काम पाहिले तर सरकारच्या वतीने अॅड.आर.व्ही. डासाळकर यांनी काम पाहिले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!