Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

बहीणीच्या लग्नासाठी जमवलेले पैशे जुगारात उडवून अपहरण झाल्याचे नाटक पोलिसांनी आणले उघडकीस

Spread the love

औरंगाबाद – बहीणीच्या लग्नासाठी जमवलेले ४०हजार रु.एटीएम मधून काढून ऑनलाईन जुगारात हरल्यामुळे भाऊ गायब होताच त्याच्या पालकांनी १३जानेवारी रोजी मुलगा हरवल्याची तक्रार पुंडलिकनगर पोलिसांना देत अपहरण झाल्याचा संशय व्यक्त केला.या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांनी सत्य उघडकीस आणून मुलाला पालकांच्या हवाली करंत त्याचे समुपदेशन केले.
विशाल राजेंद्र चव्हाण (२४) रा. बंबाटनगर असे या तरुणाचे नाव असून विशाल ने आई वडलांना फोन करुन सांगितले की, कॅनाॅटप्लेस सिडको मधून तीन ते चार जणांनी अपहरण करुन पैशे हिसकावले व त्याला सोलापूर रोडवरील देवीसिंग धाब्याजवळ आणून सोडले. या मिळालेल्या माहिती वरुन एपीआय घन्नशाम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सुखदेव आढाव यांनी विशाल चे मोबाईल डिटेल्स तपासले. तेंव्हा विशाल खोट बोलंत असल्याचे लक्षात येताच तो बीड मधे असल्याचे सूत्रांनी पुंडलिकनगर पोलिसांना कळवले. विशाल यास बीड येथून ताब्यात घेत चौकशी केली असता. तसेच कॅनाॅटप्लेस सिडको परिसरातील सी. सी. टि.व्ही. फुटेज तपासले असता विशाल सांगत आहे तसा प्रकार घडला नसल्याचे उघंड झाले.यावेळी विशाल ने ४०हजार रु. ऑनलाईन जुगारात हरल्याची कबुली दिली. यावेळी एपीआय सोनवणे यांनी विशाल समुपदेशन करंत त्याच्या आई वडलांना समज देऊन सोडून दिले. या प्रकरणात एएसआय विठ्ठल फरताळे, सुखदेव कावरे यांनी कारवाईत सहभाग घेतला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!