Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

कुख्यात ‘टिप्या’ आणि त्याच्या साथीदारांनी केला वकिलावर हल्ला…

Spread the love

औरंगाबाद येथे, मध्यस्थी करण्यासाठी बोलावलेल्या एका वकिलावर गुंड टिप्या व त्याच्या साथीदारानि चाकू हल्ला चढविला, उपस्थितांनी मध्यस्थी केल्याने वकिलाने तेथून पळ काढल्याने वकील थोडक्यात बचावला ही घटना मंगळवारी रात्री कार्तिक चौका लागतच्या एका हॉटेल मध्ये घडली या प्रकरणी क्रांतिचौक पोलीस ठाण्यात वकिलाने तक्रार दिली आहे.

ऑड.रत्नाकर चौरे वय-37 (रा.संजीवनी अपार्टमेंट, जयसिंगपुरा) असे जखमी वकिलांचे नाव आहे.

या प्रकरणी जखमी चौरे यांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शेख जावेद उर्फ टिप्या याने एका व्यक्तीला तक्रार न देण्यासाठी धमकावले होते, त्या भेदरलेल्या व्यक्तीने प्रकरण मिटविण्यासाठी मध्यस्थी म्हणून ऍड.चौरे यांना बोलावले होते, कार्तिक चौकातील मराठा नावाच्या एका हॉटेल मध्ये भेटण्याचे ठरले, तेथे टिप्या त्याच्या चार ते पाच साथीदार सह आला होता, सर्वांनी तेथे जेवण केले. बाहेर जातानाच अचानक टिप्या व त्याच्या साथीदारांनी चौरे यांच्यावर हल्ला चढविला व त्यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली दरम्यान टिप्याने जवळील धारदार चाकू काढून वार करण्यास सुरुवात केली मात्र उपस्थितांनी त्याला धरले व समजावण्याचा प्रयत्न केला याच वेळी भेदरलेले चौरे यांनी तेथून टिप्याच्या नकळत तेथून पळ काढला व रिक्षाने निघून गेले.रात्री उशिरा त्यांनी या प्रकरणी क्रांतिचौक ठाणे गाठत एम.एल.सी. पत्र घेऊन घाटी रुग्णालयात उपचार केले. या प्रकरणी दुपारपर्यंत गुन्हा दाखल झालेला न्हवता.

कोण आहे कुख्यात टिप्या ?
शेख जावेद उर्फ टिप्या (रा.विशालनगर, गारखेडा) याची पुंडलीकनगर, गरखेडा व परिसरात चांगलीच दहशत आहे, परिसरात त्याची संघटित गुन्हेगारी सक्रिय असते, त्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून त्याच्या वाढत्या गुन्हेगारी कारवाई बघता तत्कालीन पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी त्यावर स्थानबधतेची कारवाई केली होती, 30 सप्टेंबर रोजी तो हर्सूल कारागृहातून मुक्त झाला होता, त्या नंतर त्याने कोरोनाचा काळ असताना देखील मैत्रिणीच्या वाढदिवशी चक्क मध्यरात्री रस्त्यावरील एका कारवर उभे राहून मदधुंद अवस्थेत नृत्य केले होते.या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती त्यावेळी देखील त्याने पोलिसांना अरेरावी केली होती. आता पुन्हा त्याने डोके वर काढल्याचे दिसत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!