Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

UttarPradeshCrimeUpdate : सामूहिक बलात्कारानंतर अंगणवाडी सेविकेची क्रूर हत्या , पुजाऱ्यासह तिघांविरुद्ध गुन्हा

Spread the love

उत्तर प्रदेशात अनेक धक्कादायक घटना घडून त्यावर कारवाई होऊनही बलात्काराच्या घटना काही केल्या थांबायला तयार नाहीत हे खेदजनक आहे . गुन्हेगारांवरील पोलिसांचा धाक आणि पोलिसांवर असलेला शासनाचा वाचक सैल झाल्याचेच हे लक्षण आहे . याच उत्तर प्रदेशच्या बदायूमध्ये एका ५० वर्षीय आंगणवाडी कर्मचारी असलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कारानंतर तिची क्रूर हत्या करण्यात आली असल्याचे धक्कादायक वृत्त आहे.

सामूहिक बलात्कारानंतर पीडित महिलेला  बेदम मारहाण करण्यात आली. धक्कादायक म्हणजे, पीडित महिलेच्या शरीरात खासगी अंगांत लोखंडी रॉड घुसवल्याचंही वृत्त आहे. दरम्यान प्रकरण बेजबाबदारपणे हाताळण्यासाठी एसएसपी संकल्प शर्मा यांनी स्टेशनप्रभारी राघवेंद्र प्रताप सिंह यांना निलंबित केलं आहे. या प्रकरणात पुजाऱ्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे.

याबाबत प्रसिद्ध झालेल्या अधिक माहितीनुसार मृत महिला आंगणवाडी सहाय्यक म्हणून काम करत होती. ३ जानेवारी सायंकाळी ही महिला मंदिरात पूजेसाठी गेली होती. या दरम्यान मंदिरात उपस्थित पुजाऱ्यासहीत तीन आरोपींनी महिलेवर सामूहिक बलात्कार केला. ३ जानेवारी रोजी रात्री आपल्या गाडीतून पीडित महिलेचा रक्तबंबाळ मृतदेह तिच्या घराबाहेर फेकून आरोपी तिथून पसार झाले होते. कुटुंबीयांकडून या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. परंतु, पोलिसांनी मात्र पीडित कुटुंबाची दिशाभूल करत त्यांना पोलीस स्टेशनच्या फेऱ्या मारायला लावल्याचा आरोप केला  जात आहे.

दरम्यान पीडित महिलेची हत्या झाली नसून विहिरीत पडून तिचा मृत्यू झाल्याचं अगोदर पोलिसांकडून कुटुंबीयांना सांगण्यात आलं. मात्र, ग्रामस्थांनी आणि कुटुंबीयांनी याचा विरोध केल्यानंतर पोलिसांचा बेजबाबदारपणा उघड झाला. माध्यमांद्वारे ही घटना वरिष्ठांपर्यंत पोहचल्यानंतर मंदिराच्या महंतासोबतच इतर दोन आरोपींवर सामूहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतरही पोलिसांनी ४ जानेवारी रोजी मृत महिलेच्या मृतदेहाचं शवविच्छेदन न करता ५ जानेवारी रोजी म्हणजेच मृत्यूनंतर तब्बल ४८ तासांनंतर करण्यात आले. पोलिसांकडून मंदिराचा महंत आणि इतर आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न सुरू होता असा आरोप पीडित कुटुंबानं केला आहे.

वरिष्ठांनी आदेश दिल्यानंतर पीडित महिलेच्या शवविच्छेदनात आंगणवाडी सेविकेवर करण्यात आलेल्या अत्याचारांचा शोध लागला. या अहवालात महिलेच्या शरीरावर तसेच  तिच्या गुप्त अंगावर गंभीर जखमांच्या खुणा आढळल्याचं शवविच्छेदन अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे. सोबतच खासगी अंगात लोखंडी सळी घुसवण्याचाही क्रूरपणा यातून समोर आला. या प्रकरणात पोलिसांनी महंत सत्यनारायण, सहाय्यक वेदराम आणि चालक जसपाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला  असून यातील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे तर दोन आरोपी अद्याप फरार आहेत. पोलिसांच्या चार टीम्स आरोपींचा शोध घेत आहेत.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!