Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : मराठा आरक्षण : जे मिळतंय ते घ्या आणि विषय संपवा , प्रवीण गायकवाड यांची वेगळी भूमिका

Spread the love

राज्य शासनाने मराठा समाजाबाबत काल मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतल्यानंतर त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे . यावरून  खा. संभाजी महाराज छत्रपती यांनी संताप व्यक्त केला आहे तर मराठा आरक्षणाचे अभ्यासक आणि संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी मात्र मराठा समाजानं आर्थिक दुर्बल घटकातील आरक्षण घ्यावं आणि आरक्षणाचा विषय संपवावा असं मत प्रवीण गायकवाड यांनी व्यक्त केलं आहे. मराठा समाजाला विशेष प्रवर्ग म्हणून आरक्षण देणे हे नव्या घटनादुरुस्तीनुसार शक्य नसून मराठा समाजातील मोठा वर्ग हा कुणबी म्हणून ओबीसी आरक्षणाचा लाभ घेत आहे. फडणवीस सरकारने केलेला एसईबीसीचा मराठा आरक्षणाचा कायदाच चुकीचा होता. घटनेच्या चौकटीत असं जातीसाठी वर्ग न निर्माण करता दिलेल आरक्षण टिकू शकत नाही असंही प्रवीण गायकवाड म्हटलं आहे.

पुण्यात आज काही संघटनांनी राज्य सरकारच्या ईडब्ल्यूएस आरक्षणाच्या निर्णयाची प्रत जाळून निषेध केला. या पार्श्वभूमीवर बोलताना प्रवीण गायकवाड यांनी मराठा समाजानं आर्थिक दुर्बल घटकातील आरक्षण घ्यावं आणि आरक्षणाचा विषय संपवावा असं म्हटलं आहे.ईडब्ल्यूएस आरक्षणाबाबतच्या निर्णयाबाबत त्यांनी राज्य सरकारचं अभिनंदन केलं. मराठा तरुणांनी ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ घ्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं. मराठा समाजाला मराठा कुणबी आणि कुणबी मराठा असा लाभ मिळतोय. सगळं खाजगीकरण होणार आहे, त्यामुळं सरकारी नोकरीच्या भरवशावर राहू नये. आरक्षणाच्या पलिकडे खूप मोठी स्पर्धा आहे. आता ८५ टक्के नोकऱ्या खाजगीकरणात आहेत. पहिल्यासारखं आरक्षणाच्या माध्यमातून सरकारी नोकरी सुरक्षित होती, असं आता राहिलेलं नाही, असंही प्रवीण गायकवाड म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!