Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraCoronaUpdate : गेल्या २४ तासात ३५८० नवे रुग्ण , ३१७१ रुग्णांना डिस्चार्ज

Spread the love

राज्यात आज ८९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून दिवसभरात ३ हजार ५८० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर ३ हजार १७१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे.  दरम्यान, राज्याचा रिकव्हरी रेट सध्या ९४.५ टक्के इतका असून अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या सध्या ५४ हजार ८९१ इतकी आहे.

दरम्यान राज्यातील करोना मृत्यू ही अजूनही चिंतेची बाब आहे. आज आणखी ८९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून एकूण मृत्यूंचा आकडा आता ४९ हजार ५८ इतका झाला आहे. यात सर्वाधिक ११ हजार ४५ मृत्यू मुंबई पालिका हद्दीत झाले आहेत. सध्या राज्यातील करोना मृत्यूदर २.५७ टक्के एवढा आहे. आज राज्यात ३ हजार ५८० नवीन रुग्णांचे निदान झाले असून ३ हजार १७१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण १८ लाख ४ हजार ८७१ करोना बाधित रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) आता ९४.५ टक्के इतके झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी २३ लाख ४१ हजार २०४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९ लाख ९ हजार ९५१ (१५.४८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४ लाख ८२ हजार ७७९ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर ३ हजार ८१० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

राज्यात सध्या ५४ हजार ८९१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यात पुणे जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा सातत्याने सर्वाधिक राहिला असून यात आता मोठी घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. आजच्या आकडेवारीनुसार पुणे जिल्ह्यात १३ हजार ६३९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यानंतर ठाणे जिल्ह्यात १० हजार ९ अॅक्टिव्ह रुग्ण असून मुंबईतील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या किंचित वाढून ८ हजार १४ इतकी झाली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!