Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : तरुणीला बंटी बबलीकडून २ लाख ९५ हजारांचा गंडा

Spread the love

औरंगाबाद – QR कोड स्कॅन करुन १०रु पाठवले व तरुणीच्या बॅक खात्यातून २लाख ९५ हजार लंपास केले.या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिसठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
६ डिसेंबरला छत्रपतीनगरात राहणार्‍या वैभवी विलास सुक्रे(२३) हिने OLX अॅपवर टेबल विक्रीसाठी जाहिरात टाकली. थोड्याच वेळात भामट्या महिलेने अडीच हजार रु.टूबल खरेदी केल्याचे सांगत आणखी एक स्टॅंड OLX वर टाकले.थोड्याच वेळात मदन शर्मा बोलतो असे सांगून वैभवी ला QR कोड स्कॅन करुन १०रु. पाठवले.व वैभवी ला तिचा QR कोड स्कॅन करण्यास सांगून तिच्या बॅंक खात्यातून २लाख ९५ हजार ५०३ रु लंपास केले. या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक घन्नशाम सोनवणे करंत आहेत.

शेतक-याचा खिसा कापणारा गजाआड

औरंंंगाबाद : गुडघेदुखीवर उपचार करण्यासाठी औरंगाबाद शहरात आलेल्या वृध्द शेतक-याचा खिसा कापून ७० हजार रूपये लंपास करणा-या पाकीटमारास सिडको पोलिसांनी पाठलाग करून गजाआड केले. नावजमील मुनसी पठाण (वय ३३, रा.बिस्मीला मस्जीदजवळ, संसार बिल्डींगमागे, मिसारवाडी) असे पाकीटमाराचे नाव असून पोलिसांनी त्याच्या ताब्यातून १८ हजार ५०० रूपये जप्त केले असल्याची माहिती सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी यांनी शुक्रवारी (दि.११) कळविली आहे.

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वाकडी गावातील रहिवासी अहेमद खान अमिर खान पठाण (वय ६०) हे २ डिसेंबर रोजी कापूस विक्री करून आलेले ७० हजार रूपये घेवून गुडघेदुखीवर उपचार करण्यासाठी औरंगाबादला आले होते. हडको कॉर्नर येथून रिक्षाने ते रहेमानिया कॉलनीत राहणा-या मुलाकडे रिक्षाने जात होते. त्यावेळी रिक्षात सहप्रवासी म्हणून बसलेल्या नावजमील मुनसी पठाण यांने शिताफीने त्यांच्या खिशातून ७० हजार रूपये लंपास केले होते. सिडको पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर, जमादार नरसिंग पवार, संतोष मुदीराज, इरफान खान पठाण आदींचे पथक शुक्रवारी गस्तीवर होते. पोलिसांना पाहुन जळगांव रोडवरून शरद टि पॉईन्टकडे पळून जात असलेल्या नावजमील मुनसी पठाण याला पोलिसांनी पाठलाग करून पकडले. चौकशीदरम्यान, त्याने अहेमद खान अमिर खान पठाण यांचा खिसा कापून ७० हजार रूपये चोरले असल्याची कबूली दिली.

महावितरणच्या कर्मचा-याला शिवीगाळ

औरंंंगाबाद : महावितरणच्या उपविभाग कार्यालयात शिरुन कर्मचा-याला शिवीगाळ करणा-या इसमाविरुध्द सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणच्या शहागंज कार्यालयातील निम्नस्तर लिपिक (लेखा) सचिन पंचारिया हे शुक्रवारी कार्यालयीन कामकाज करत होते. सकाळी साडेअकराच्या सुमारास एक जण कार्यालयात आला. तुम्ही कार्यालयाची जागा का बदलली, वीजबिल चुकीचे आले आहे. असे म्हणत त्याने पंचारिया यांना शिवीगाळ करून वीजबिल टेबलावर भिरकावले. तसेच पंचारिया यांना धमकावले. त्यावेळी पंचारियांचे सहकारी निम्नस्तर लिपिक ऋषिकेश देशपांडे हे समजावून सांगण्यासाठी गेल्यावर त्या इसमाने त्यांनाही शिवीगाळ केली.
या प्रकारानंतर महावितरणच्या शहागंज उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता आशुतोष शिरोळे, शहागंज शाखेचे सहायक अभियंता वसीम पटेल यांनी पंचारिया व देशपांडेंसह सिटीचौक पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!