Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : व्वारे !! आयपीएस-आयएएस अधिकारी !! भ्रष्टाचाराच्या विरोधात दिले भाषण आणि तासाभरात ८० हजाराची लाच घेताना पकडला गेला, जिल्हाधिकारीही गोत्यात

Spread the love

१. एका तासापूर्वी एसीबीचा हेल्पलाईन नंबर जारी करताना आणि २. एका तासानंतर ८० हजाराची लाच स्वीकारल्यानंतर  आयपीएस डीएसपी भैरूलाल मीणा

तासभर आधी आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिनानिमित्त  त्या अधिकाऱ्याने लाच आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात भाषण दिल्यानंतर एसीबीच्याच डीएसपीला तासाभरानंतर ८० हजाराची लाच घेतल्याच्या आरोपांखाली अटक करण्यात आली. राजस्थानात  माधोपूर येथे बुधवारी हा विचित्र आणि बहुचर्चित ट्रॅप झाला . दरम्यान याच दिवशी बारां येथील जिल्हाधिकारी इंद्र सिंह राव यांचा स्वीय सहायक  महावीर नागर यालाही १.४० हजाराची लाच घेताना अटक करण्यात आली  आपल्या कबुली जबाबात त्याने सांगितले कि , या पैकी ४० हजाराचा हिस्सा त्याचा असून उर्वरित एक लाख जिल्हाधिकाऱ्यांना द्यायचे होते.

त्याचे असे झाले कि , अँटी करप्शन ब्युरोच्या (एसीबी) कार्यालयात आंतरारष्ट्रीय दिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  या कार्यक्रमात  लाच लुचपत प्रतिबंधक खात्याचे डीएसपी भैरूलाल मीणा, आयपीएस  हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या ठिकाणी उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले, “आपल्याला संपूर्ण प्रामाणिकपणे भारताला भ्रष्टाचारापासून मुक्त करायचं आहे. केंद्र किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही कर्मचाऱ्याने लाच मागितली तर १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा,” असं आवाहनही त्यांनी केलं होतं.

धक्कादायक  म्हणजे या भाषणाच्या एक तासानंतर डीएसपी मीणा यांना ८० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली. तसेच त्यांना लाच देणाऱ्या जिल्हा परिवहन अधिकाऱ्यालाही अटक झाली. एसीबीच्या कार्यालयात असलेल्या आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्याला खुद्द एसीबीनंच जाळ्यात अडकवल्याचं उदाहरण पहिल्यांदाच पहायला मिळालं आहे. एसीबीला अनेक प्रयत्नांनंतर डीएसपी मीणा यांच्याविरोधात पुरावे मिळाले होते. या पुराव्यांच्या आधारे एसीबीची टीम आणखी काही अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करु शकते.

या ट्रॅपबाबत अधिक माहिती देताना , एसीबीचे महासंचालक बीएल जोशी यांनी सांगितलं की, “कोटा येथील आकाशवाणी कॉलनीत राहणाऱ्या डीएसपी भैरुलाल मीणा जे सवाई माधोपूरमधील एसबी पोलीस ठाण्याचे प्रभारी आहेत. त्यांच्याविरोधात अनेक दिवसांपासून तक्रारी येत होत्या. एसबी चौकात अधिकाऱ्यांना बोलावून ते पैसे घेत असतं. त्यामुळे एसीबीची टीम सातत्याने त्यांच्यावर लक्ष ठेवून होती.” बुधवारी या चौकात एसीबीची टीम पोहोचली तेव्हा करौली येथील दलपूरा येथे राहणाऱ्या डीटीओ महेशचंद , मीणा यांना  मासिक हप्त्याचे ८० हजार रुपये देत होते. दरम्यान, डीएसपी मीणा यांच्या घरावर छापा टाकल्यानंतर एसीबीच्या टीमला जमिनींची कादपत्रे आणि १.६१ लाख रोख रुपये आढळून आले. आता एसीबीची टीम त्यांच्या अन्य ठिकाणांचा शोध घेत आहे.

जिल्हाधिकारीही एसीबीच्या जाळ्यात

दरम्यान याच दिवशी बारा यांच्या स्वीय सहायकालाही १.४० लाखाची लाच घेताना रंगे हात पकडण्यात आले. यात जिल्हाधिकारी इंद्र सिंह राव यांचे नाव आल्याने त्यांनाही अटक होऊ शकते. याबाबत एसीबीचे महासंचालकबीएल सोनी  यांनी सांगितले कि ,  एसीबीच्या कोटा यूनिट कडून तक्रार अली होती कि , एका पेट्रोल पंपाची NOC देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना १ लाख आणि त्यांच्या सहायकाला ४० हजार हवे होते. त्यानुसार हा ट्रॅप झाला. आपल्या ३१ वर्षाच्या सेवेत राव यांनी ४५ पदांवर काम केले असून एकदा ते निलंबित झाले आहेत तर ६ वेळा पदावनत झाले आहेत. चार वर्षांपूर्वी त्यांना भाजपच्या काळात आयएएस पद बहाल करण्यात आले होते. तर २०१८ मध्ये काँग्रेसच्या काळात त्यांना जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली होती. आणि त्यांची हि पहिलीच पोस्टिंग होती.

कोटाचे एसीबीचे एएसपी चंद्रशील ठाकुर यांनी त्यांच्याविरुद्ध हि कारवाई केली. त्यांनी सांगितले कि , अत्रु येथील गोविंद सिंह अटलपुरी यांनी  कोटा कार्यालयात तक्रार दिली होती कि , त्यांच्या  पेट्रोल पंपाच्या लीजच्या नूतनीकरणासाठी त्यांचा पीए महावीर नागर  याने २.४० हजाराची मागणी केली होती . हे प्रकरण आयएएस अधिकाऱ्याशी संबंधित असल्याने ठाकूर यांनी हि तक्रार एसीबीचे महासंचालक बीएल सोनी आणि अतिरिक्त महासंचालक  दिनेश एम एन यांच्या कानावर घातली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हि कारवाई करण्यात आली .

आपलं सरकार

Click to listen highlighted text!