Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AmericaPresidentElection : ताजी बातमी : अखेर जो बायडन अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष , ट्रम्प यांचा पराभव

Spread the love

संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या अमेरिका अध्यक्षपदाच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत अखेर जो बायडन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला असल्याचे वृत्त आहे . या विजयामुळे जो बायडन अमेरिकेचे ४६ वे  राष्ट्राध्यक्ष होणार आहेत. विशेष म्हणजे या निर्णयाच्या काही वेळापूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी ही निवडणूक जिंकल्याचा दावा एका ओळीचं ट्विट करुन केला होता. मत्र प्रत्यक्षात जो बायडन यांनी ही निवडणूक जिंकली असल्याचे स्पष्ट झाले आहे. अमेरिकेतल्या वृत्तसंस्थांनी जो बायडन यांचा विजय झाल्याचं वृत्त दिलं आहे. पेनसिल्व्हानियाच्या मतमोजणीत 270 इलेक्टोरल कॉलेजची मते मिळाल्यानंतर  त्यांचा विजय  निश्चित झाला. तर अमेरिकेच्या उपराष्ट्रपतीपदी कमला हॅरीस यांची  निवड झाली आहे.


बायडन यांना २८४ तर ट्रम्प यांना २१४ इतकी इलेक्टोरल मते मिळाली. अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत बायडन विक्रमी मतांनी विजयी झाले आहेत. बायडन यांना सात कोटींहून अधिक मते मिळाली. बायडन यांच्या विजयामुळे अमेरिकेच्या उपराष्ट्रपतीपदी कमला हॅरीस यांची निवड होणार आहेत. आफ्रो-अमेरिकन वंशाच्या कमला हॅरीस आता अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्रपती असणार आहेत. बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष असताना जो बायडन यांच्याकडे उपराष्ट्रपतीपदाची जबाबदारी होती. बायडन यांना मिळालेली मते ही आतापर्यंतची सर्वाधिक मते आहेत. याआधी बराक ओबामा यांना २००८ च्या निवडणुकीत सहा कोटी ९४ लाख मते मिळाली होती.

डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन यांच्यात चुरस कायम होती. स्विंग स्टेटमध्ये बायडन यांनी दमदार कामगिरी करताना ट्रम्प यांना जोरदार धक्का दिला. दरम्यान मतमोजणीच्या मुद्यावरून ट्रम्प यांनी कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. अखेरच्या टप्प्यात जॉर्जिया, पेन्सिलवेनिया, नॉर्थ कॅरिलोना आणि नेवादा या राज्यांच्या हाती सत्तेची चावी होती. मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात बायडन नेवादात आघाडीवर होते. तर, ट्रम्प इतर तीन राज्यांमध्ये आघाडीवर होते. मात्र, मतमोजणी वाढू लागल्यानंतर अखेरच्या टप्प्यात बायडन यांनी मारली. डेमोक्रॅटीक पक्षाने तब्बल २८ वर्षांनी जॉर्जिय आपल्याकडे खेचून आणले.

दरम्यान हे वृत्त येण्यापूर्वी अशात ही निवडणूक आपण जिंकलो आहे असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. विजयासाठी २७० इलेक्ट्रोल व्होट्सची गरज असते. याच्या जवळ जो बायडन असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी एका ओळीचं ट्विट करत ही निवडणूक आपणच जिंकलो आहे असा दावा केला होता. I WON THIS ELECTION, BY A LOT असं एका ओळीचं ट्विट करत डोनाल्ड ट्रम्प यांनी विजयाचा दावा केला होता. सोशल मीडियावर सध्या त्यांच्या या ट्विटची चर्चा चांगलीच रंगली आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प या दोघांमध्ये ही लढत होती. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीची मतमोजणी ही चांगलीच लांबली होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!