Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

WorldNewsUpdate : कमला हॅरिस अमेरिकेच्या पहिल्या उपराष्ट्रपतीपदी विराजमान झाल्याने भारतात का झाला आनंद ?

Spread the love

जी. बालचंद्रन , कमला यांचे काका . Photo Courtesy:  Manisha Mondal | ThePrint

संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारी अमेरिेकेच्या राष्ट्रपती -उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक, उपराष्ट्रपतीपदी  कमला हॅरीस या निवडून आल्यामुळे भारतात विशेष आनंद व्यक्त केला जात आहे . त्यांचे काका जी . बालचंद्रन  हे त्यांच्या विजयाने अधिक खुश आहेत . आफ्रिकन-अमेरिकन आणि आशियाई-अमेरिकन महिला म्हणून ओळख असलेल्या कमला हॅरीस यांच्या आई या भारतीय वंशाच्या डॉक्टर होत्या. तर, वडील जमैकामधील अर्थतज्ज्ञ  होते. डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील हॅरीस यांना अनेक प्रचार सभांमधून टार्गेट केले होते . मात्र, अमेरिकन नागरिकांनी डेमोक्रॅटीक पक्षाच्या जो बायडन आणि कमला हॅरीस यांना भरभरून मतदान केले.


नवनिर्वाचित उपराष्ट्रपती  कमला हॅरीस यांचा जन्म १९६४ चा आहे . आपला लहानपणीचा बराच काळ हा आजोबांसोबत (आईचे वडील) घालवला. आजोबा पी. व्ही. गोपालन झांबिया येथे राहणारे होते. गोपालन हे भारत सरकारचे अधिकारी होते. त्यांना झिम्बाब्वेच्या शरणार्थींच्या नोंदी आणि इतर कामासाठी पाठवण्यात आले होते. त्यावेळी झिम्बाब्वे नुकताच ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला होता. माझे आजोबा हे माझ्या आवडीच्या लोकांपैकी एक असल्याचे कमला हॅरीस यांनी याआधीही सांगितले आहे. कमला हॅरीस यांच्या आई श्यामला गोपालन तामिळ वंशाच्या भारतीय-अमेरिकन श्यामला या नावाजलेल्या कॅन्सर संशोधक आणि सक्रिय कार्यकर्त्या होत्या. आपल्या मुलांची नाळ भारतासोबत कायम जुळलेली असावी यासाठी प्रयत्न केले.  त्यांनी आपल्या मुलींचे नावही कमला असेच ठेवले. कमला हॅरीस यांच्यावर त्यांच्या आईचा मोठा प्रभाव आहे. स्थलांतर, समान अधिकाराच्या मुद्यावर कमला हॅरीस यांची मते ही त्यांच्या आईसारखीच आहे. श्यामला गोपालन यांचे पदवी शिक्षण दिल्लीतून झाले. श्यामला ह्या फक्त संशोधकच नव्हे तर मानवाधिकार कार्यकर्त्या म्हणूनही सक्रिय होत्या.

जगप्रसिद्ध  हार्वर्ड विद्यापीठातून कमला यांनी राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्राचा अभ्यास केला. हार्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेत असताना त्यांनी कॅलिफोर्नियातील तत्कालीन सिनेटर अॅलन क्रॅस्टन यांच्यासाठी मेलरूम क्लर्क म्हणून काम केले. त्यावेळी अॅलन यांनीदेखील राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी केली होती. १९९० च्या सुमारास कमला हॅरीस यांनी आपले कायद्याचे शिक्षण पूर्ण केले आणि डेप्युटी डिस्ट्रिक्ट अटर्नी म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

कमला यांची राजकीय कारकीर्द

कमला हॅरीस या २००३ ते २०११ दरम्यान सन फ्रॅन्सिस्कोच्या ड्रिस्ट्रिक्ट अटर्नी म्हणून कार्यरत होत्या. २०१६ मध्ये त्यांनी रिपब्लिकन सिनेटर लोरेटा सानशेज यांचा पराभव करत अमेरिकन सिनेटमध्ये कनिष्ठ प्रतिनिधी म्हणून निवडून आल्या. अमेरिकन काँग्रेसच्या अप्पर चेंबरपर्यंत निवड होणाऱ्या हॅरीस या दुसऱ्या कृष्णवर्णीय आणि पहिल्या दक्षिण आशियाई-अमेरिकन महिला होत्या. कमला हॅरीस या कॅलिफोर्नियाच्या अॅटर्नी जनरल म्हणून काम करत असताना त्यांची कामाची पद्धत लोकांनी पाहिली आहे. त्यांनी अनेक मोठ्या बँकांना आव्हान दिले होते. काम करणाऱ्या लोकांची त्यांनी मदत केली आहे. महिला व बालकांना शोषणापासून त्यांनी वाचवले आहे. मला त्यावेळीदेखील मला त्यांचा अभिमान वाटत होता आणि आताही अभिमान वाटत असल्याची भावना बायडन यांनी त्यांच्याबद्दल व्यक्त केली होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!