Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MarathawadaNewsUpdate : आयएएस अधिकारी शिंदे यांचा मृत्यू नेमका कशामुळे ? कटुंबीयांनी केला हा गंभीर आरोप

Spread the love

देशात कोरोनाची लाट आल्यापासून कोरोनासारख्या खतरनाक आजारामुळे अनेकांचा मृत्यू होत आहे. मात्र काही मृत्यूच्या बाबतीत प्रश्नचिन्ह उभे केले जात असले तरी या प्रश्नांची उत्तरे देणार कोण असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. रुग्णालयात चालत गेला आणि त्याच्या निधनाचे वृत्त मिळले अशी अनेक उदाहरणे समोर आली आली आहेत . याच मालिकेत मराठवाड्याचे भूमिपूत्र  आणि  त्रिपुरा केडरचे आयएएस अधिकारी सुधाकर शिंदे यांच्या मृत्यूनंतर आता त्यांचे बंधू ज्ञानेश्वर शिंदे यांनी नांदेड येथील सरकारी रुग्णालयावर गंभीर आरोप केला आहे. नांदेडमध्ये सुधाकर यांना योग्य उपचार मिळाले नाहीत आणि त्याची खूप मोठी शिक्षा आज आम्हाला भोगावी लागत आहे, अशा तीव्र भावना ज्ञानेश्वर यांनी व्यक्त केल्या आहेत. विशेष म्हणजे दोनवेळा त्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह अली होती परंतु त्यांना कोरोनासदृश लक्षणे असल्याचे सांगण्यात येत होते. चांगलं रुग्णालय मिळावं म्हणून आम्ही परभणीहून नांदेडला आणि नांदेडमधून औरंगाबादला आणि पुढे पुण्याला गेलो होतो पण आमची निराशा झाली. योग्य उपचारा अभावी आमचा भाऊ आम्ही गमावला, अशा शोकाकूल भावना व्यक्त करत ज्ञानेश्वर शिंदे यांनी एकंदर आरोग्य व्यवस्थेच्या ढिसाळपणावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

शिंदे यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार सुधाकर शिंदे हे त्रिपुरामध्ये अर्थ विभागात सचिव या पदावर कार्यरत होते. परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यात उमरा काशीद हे त्यांचे गाव असून ते १५ दिवसांच्या सुट्टीवर गावी आले होते. या सुट्टीतच  शिंदे यांची तब्यत थोडीशी बिघडली होती. त्यांना सर्दी ताप असल्याने लगेचच नांदेड येथील गुरु गोविंदसिंग शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र तिथे त्यांची तब्येत अधिकच खालावली. त्यानंतर तातडीने त्यांना औरंगाबाद येथे हलवण्यात आले. मात्र तिथेही त्यांच्या  प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यामुळे त्यांना पुणे येथील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याच उपचारादरम्यान शिंदे यांचे शुक्रवारी निधन झाले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार शिंदे यांना करोना सदृष्य लक्षणे होती. त्यामुळे दोन वेळा त्यांची चाचणीही करण्यात आली. मात्र या चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले होते. त्यानंतरही शिंदे यांचे निधन झाल्याने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन वर्षांचा मुलगा, वडील, चार भाऊ, तीन बहिणी असा शिंदे यांचा मोठा परिवार असून कुटुंबातील सर्वात कर्तबगार व्यक्तीच्या अकाली जाण्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. दरम्यान, पुणे प्रशासनाने शिंदे यांच्या मृतदेहावर पुण्यातच अत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या घेतल्याने त्यांच्या कुटुंबियांना पुणे येथे बोलावण्यात आले होते.

सुधाकर शिंदे या अवघ्या ३४ वर्षीय आयएएस अधिकाऱ्याच्या निधनाने सारेच हळहळले आहेत. सर्वच स्तरांतून या अधिकाऱ्याला श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लबकुमार देव यांनी शिंदे यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. ‘सुधाकर शिंदे यांच्या निधनाची वार्ता धक्कादायक आहे. त्यांच्या निधनाने त्रिपुराने एक मृदु स्वभावाचा कर्तबगार अधिकारी गमावला आहे. राज्याची आज खूप मोठी हानी झाली आहे’, अशा भावना देव यांनी ट्वीटरच्या माध्यमातून व्यक्त केल्या. शिंदे यांच्या पत्नीशी संपर्क साधून सांत्वन व्यक्त केल्याचेही त्यांनी नमूद केले. अनेक आयएएस अधिकाऱ्यांनीही सुधाकर शिंदे यांना सोशल मीडियातून श्रद्धांजली वाहिली आहे. त्रिपुरातील कारागृहांचा कायापालट करण्यात उल्लेखनीय कामगिरी करणारा एक हरहुन्नरी अधिकारी आज आपल्यातून निघून गेला, अशा भावना आयएएस प्रियांका शुक्ला यांनी व्यक्त केल्या तर आयएएस अवनिश शरण यांनीही शिंदे यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. दरम्यान राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनीही आपली आदरांजली अर्पण केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!