Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

HatharasGangRapeCase : सवर्ण समाजाचे आरोपींना बळ , सामूहिक वर्गणीतून ” या ” वकिलाला दिले जात आहे वकील पत्र, ऍट्रॉसिटीला आहे विरोध…

Spread the love

एका  बाजूला युपीमधील हाथरसच्या घटनेनंतर पीडितेच्या बाजूने विरोधक आक्रमक झाले आहेत. तर दुसरीकडे सवर्णांच्या संघटना आणि नेते आरोपींच्या बाजूने उभे राहताना दिसत आहेत. एका वृत्तानुसार अखिल भारतीय क्षत्रिय महासभेने आरोपींच्या बाजूने कोर्टात खटला लढण्यासाठी दिल्लीतील निर्भया प्रकरणातील सर्व आरोपींचा खटला लढणारे वकील ए.पी. सिंह आता हाथरस प्रकरणात आरोपींचे वकील असणार आहेत. एनडीटीव्ही इंडियाशी बातचीत करताना स्वतः सिंह यांनी हि माहिती दिली. एक वकील म्हणून माझ्या दारात जे येतील त्यांना न्याय देणे हा माझा धर्म असल्याचे सिंह यांचे मत आहे तर अनुसूचित जाती -जमाती अन्याय अत्याचार  प्रतिबंधक कायद्याचा गैरवापर होतो आहे हे त्यांचे मत आहे. महासभेच्या घेतलेल्या निर्णयानुसार आरोपींच्या कुटुंबियांनी आपणास वकीलपत्र दिल्याचेही सिंह म्हणाले.

त्यांनी स्वतः दिलेल्या माहितीनुसार माजी केंद्रीय मंत्री राजा मानवेंद्र सिंह यांच्या वतीने ए. पी. सिंह यांना हाथरस आरोपींचा खटला लढवण्यास सांगण्यात आलं आहे. दरम्यान आज तक च्या वृत्तानुसार मानवेंद्र सिंह यांनी या प्रकरणी पत्रक जारी केलं आहे. अखिल भारतीय क्षत्रिय महासभा देणगी जमा करून वकील ए.पी. सिंह यांची फी भरेल, असं मानवेंद्र सिंह यांनी पत्रात म्हटलं आहे. हाथरस प्रकरणाच्या माध्यमातून एससी-एसटी कायद्याचा दुरुपयोग करून सवर्णांची बदनामी केली जात आहे. यामुळे खासकरुन राजपूत समाजाला इजा झाली आहे. या प्रकरणी सत्य बाहेर येण्यासाठी आरोपींच्या वतीने ए. पी. सिंह यांची वकील म्हणून नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. हाथरस प्रकरणातील आरोपींच्या कुटुंबीयांनीही ए. पी. सिंह यांना वकील म्हणून नेमण्याचा आग्रह करण्यात आलं आहे, असं पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!