Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

HathrasGangRapeCase : हाथरस प्रकरणात पोलिसांकडून दाखल झाला धक्कादायक एफआयआर

Spread the love

उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरण वेगळ्याच वळणावर जात असून पोलिसांकडून १९ एफआयर दाखल करण्यात आले असून  यामधील एक एफआयआर अज्ञातांविरोधात असून देशद्रोह आणि षडयंत्र रचल्याचा आरोप आहे. पीडितेवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्येनंतर तिच्या कुटुंबाला राज्य सरकारविरोधात खोटं बोलण्यासाठी ५० लाखांची ऑफर देण्यात आली होती असाही आरोप या एफआयआरमध्ये करण्यात आलेला आहे.

याबाबत एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे कि ,  पोलीस उपनिरीक्षकाच्या तक्रारीवर हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या फिर्यादीमध्ये म्हटले आहे कि , “राज्य सरकारविरोधात खोटं बोलण्यासाठी पीडितेच्या कुटुंबाला काही घटकांकडून ५० लाखांची ऑफर देण्यात आली”. एफआयआरमध्ये हे घटक म्हणजे नेमके कोण आहेत याबद्दल कोणतीही माहिती दिली गेलेली नाही. याशिवाय उत्तर प्रदेशात जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे. एफआयआरमध्ये सांगण्यात आलं आहे की, एका अज्ञात पत्रकाराने पीडितेच्या भावाला आई-वडिलांचा व्हिडीओ रेकॉर्ड करुन आपण राज्य सरकारवर समाधानी नसल्याचं सांगण्यास भाग पाडलं. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधातील खोटी विधानं सोशल मीडियावर व्हायरल करत सरकारची बदनामी करण्याचं षडयंत्र रचण्यात आल्याचाही आरोप एफआयआरमध्ये आहे.

दरम्यान हाथरस प्रकरण हाताळण्यावरुन टीका होत असताना पोलिसांनी राज्यातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला आहे. सरकारच्या प्रगतीविरोधात नाराज असणारे प्रकरणाला वेगळं वळण देत असल्याचा आरोप योगी आदित्यनाथ यांनी केल्यानंतर या केसेस दाखल करण्यात आल्या. एफआयआरसंबंधी बोलताना वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रशांत कुमार यांनी, “हाथरस घटनेमागे मोठं षडयंत्र असून आम्ही सत्याचा तपास करु,” असं म्हटलं आहे. हाथरस प्रकरण कायद्याच्या डावपेचांमध्ये अडकतच चालले असल्याचे स्पष्ट होत आहे. हा एफआयआर हाथरसच्या चांदपा ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अवधेश कुमार यांनी दाखल केला आहे.

या एफआयआरमध्ये म्हटले आहे कि , पीडितेच्या कुटुंबाला एका सुनियोजित गुन्हेगारी षडयंत्राद्वारे फसवले गेले. असामाजिक घटकांनी पीडितेच्या कुटुंबाला राज्य सरकारच्या विरोधात वक्तव्ये करण्यासाठी ५० लाख रुपयांचे प्रलोभन दिले गेले. असामाजिक घटक वर्ग आणि जातीला भडकवून राज्यात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करीत होते. सामूहिक बलात्कार झाल्याचे सांगावे यासाठी पीडितेच्या कुटुंबावर पुन्हा पुन्हा दबाव आणला गेला, तर पहिल्या तक्रारीत पीडितेच्या कुटुंबाने मुलीवर प्राणघातक हल्ला झाल्याचे सांगितले होते. राज्य सरकारची प्रतिमा कलंकित करून संपूर्ण राज्यात खळबळ उडवण्याचा प्रयत्न केला गेला आणि शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला गेला. सोशल मीडियावर लोकांना भडकवण्यासाठी सर्व खोटे फोटो आणि ऑडिओ व्हायरल करण्यात आले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सरकारची प्रगती पाहून काही लोक हाथरस घोटाळ्याचा गैरफायदा घेत आहेत, असा दावा केला. त्यानंतर हा खटला दाखल करण्यात आला. हाथरसमध्ये एक मोठे षडयंत्र रचण्यात आले आहे. आम्ही सत्य शोधून काढू, असे वरिष्ठ पोलिस अधिकारी प्रशांत कुमार यांनी सोमवारी दाखल केलेल्या खटल्याबाबत म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!