Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

HathrasGangRapecase : मुख्य आरोपी आणि पीडिता यांच्या फोनमध्ये आढळले १०४ कॉल , पोलिसांच्या तपासातील प्राथमिक माहिती

Spread the love

उत्तर प्रदेशातील हाथरसमधील कथित सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या  प्राथमिक तपासात १९ वर्षीय पीडित तरुणी या प्रकरणातील मुख्य आरोपीच्या सतत संपर्कात होती अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.  संदीप सिंह हा या प्रकरणातील मुख्य आरोपी  असून तो याच गावाचा आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबाचा आणि मुख्य आरोपीचे फोन कॉल्स तपासले आहे. यात पीडित तरुणी मुख्य आरोपींशी सतत फोनवरून संपर्कात होती, अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.

या बाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार आरोपी संदीपला पीडितेच्या भावाच्या नावावर असलेल्या एका नंबरवरुन सतत फोन कॉल येत असल्याचं तपासात समोर आलं आहे. पीडितेच्या भावाच्या मोबाइल क्रमांकावरून आणि संदीपच्या मोबाइल क्रमांकावर १३ ऑक्टोबर २०१९ पासून बोलणं सुरू झालं. बहुतेक कॉल चांदपा भागात असलेल्या सेल टॉवर्सवरून केले गेले होते. हे गाव पीडितेच्या बुलगढीपासून केवळ २ किमी अंतरावर आहे. दोन्ही फोन नंबरदरम्यान ६२ कॉल आउटगोइंग आणि ४२ इनकमिंग कॉल कॉलसह एकूण १०४ कॉल होते. कॉल रेकॉर्डवरून पीडिता  आणि मुख्य आरोपी सतत संपर्कात असल्याचं दिसून आलं आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

हाथरसची घटना १४ सप्टेंबरला घडली. यावेळी पीडित तरुणी शेतात काम करत होती. यावेळी तिला आरोपीने खेचून जवळच्या शेतात आणले आणि तिला मारहाण केली. तिच्यावर सामूहिक बलात्कार केला गेला आणि तिचा गळा दाबल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे. यामुळे गळ्याचं हाड आणि पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाल्याने तिला प्रारंभी अलिगढच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यानंतर तिला दिल्लीतील रूग्णालयात पाठवण्यात आलं. तिथे तिचा २९ सप्टेंबरला मृत्यू झाला. दरम्यान पीडितेच्या मृत्युवरून सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया उमटल्या. युपी पोलिसांनी पीडित तरुणीच्या पार्थिवावर रातोरात अंत्यसंस्कार केले. पुढे गावाला पोलिसांनी  घेरले आणि सर्वांचीच नाकाबंदी केली . राजकीय नेत्यांबरोबर पत्रकारांनाही  गावात जाण्यास मज्जाव करण्यात आला यामुळे हे प्रकरण आणखी चिघळलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!