Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MarathawadaNewsUpdate : हाथरस प्रकरणातील बलात्काऱ्यांना फाशी द्या , औरंगाबाद , जालन्यात तीव्र निदर्शने

Spread the love

औरंगाबाद शहरात आज भीमशक्तीच्या वतीने क्रांतिचौकात तर आंबेडकरवादी अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने भडकलगेट येथे हाथरस येथील पिडितेवरील बलात्कार व देशातील वाढत्या दलित अत्याचार व निष्क्रिय भाजपा सरकार विरोधात जोरदार निदर्शने करण्यात येऊन बलात्काऱ्यांना फाशी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. उत्तरप्रदेशातील हाथरस येथील पीडित तरुणीवरील सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या जातीयवादी नराधमांना फाशी देण्यात यावी, सदर खटला फास्ट ट्रक कोर्टात चालवावा, पीडितेच्या कुटुंबास y+ सुरक्षा देण्यात यावी,पीडित कुटुंबाचे पुनर्वसन करून ५० लाख अर्थसहाय्य देण्यात यावे, हाथरस प्रकरणी जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक,पोलीस अधिकारी यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी अट्रोसिटी अंतर्गत कारवाई करावी,  भरोई, बलरामपूर, हाथरस येथील नराधमांना फाशी देण्यात यावी. उत्तर प्रदेश सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी, मुख्यमंत्री योगी चा राजीनामा घ्यावा, आदी मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आले. दरम्यान याच मागणीसाठी क्रांतिचौकात भीमशक्तीचे ज्येष्ठ नेते दिनकर ओंकार आणि शांतीलाल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली.

या आंदोलनात  श्रावण गायकवाड,प्रकाश निकाळजे,मिलिंद दाभाडे,कृष्णा बनकर,राजू आमराव,संजय ठोकळ,नागराज गायकवाड,अरुण बोर्डे,नितीन वाकेकर,डॉ.संदीप जाधव,सचिन निकम,गुणरत्न सोनवणे,गुल्लू वाकेकर,विजय वाहुळ,प्रमोद तायडे,संदीप आढाव,सतीश गायकवाड,धनंजय बोर्डे,लक्ष्मण हिवराळे,किशोर थोरात,गौतम खरात,गंगाधर ढगे,बाळू वाघमारे,बलराज दाभाडे,राहुल वडमारे,ऍड.अतुल कांबळे,राजेंद्र पोहाल,नवल सूर्यवंशी,डॉ.कुणाल खरात,अमोल दांडगे,सोनू नरवडे,किशोर गडकर,रुपचंद गाडेकर,साखहरी बनकर,संदीप जमधडे,प्रा.सुनील वाकेकर,आनंद कस्तुरे,विजय शिंदे,मुकेश खोतकर,गुड्डू वाकेकर,भारत इंगोले,अंकुश शिंदे,आनंद बोर्डे,प्रकाश कोतकर,विजय चौधरी,दीपक निकाळजे,चरण जाधव,चंद्रकांत रुपेकर, अरविंद कांबळे,पवन पवार,किशोर खिल्लारे,प्रा.सिद्बोधन मोरे,बाळू दाभाडे,गणेश साळवे,पंकज बनसोडे,दिनेश नवगिरे,सोमु भटकर,नितीन साळवे,रमेश मगरे,कपिल बनकर,मनीष नरवडे,विक्की जगताप,शैलेश बागुल,नरेश वरठे,अशोक मगरे,शैलेंद्र म्हस्के,महेंद्र तांबे,सागर प्रधान,विशाल इंगोले,दिनेश गवळे,दीपक जाधव,सचिन जगधने,अमित भटकर,किरण पंडित,विनोद साबळे,संतोष जाटवे,संजय जाटवे,प्रशांत म्हस्के,वैभव सरदार ,वैभव इंगोले,नितेश भोले,रोहित वाहुळ,सचिन इंगडे,प्रथम कांबळे,संकेत कांबळे,शैलेश चाबुकस्वार,सुशील दिवेकर,अक्षय दांडगे,अनमोल लिहणार,आकाश गायकवाड,मॅडी घुसळे,सागर कर्डक,अक्षय साठे,अनिकेत साळवे,योगेश सोनवणे,अमोल वाघ, विजय शिनगारे,शांतीलाल लसगरे, सुरज,पाखरे,मनोज कासारे,सम्राट सुकाळे,संदीप वाहुळ,वंदना उगले,जयश्री शिर्के,किरण गायकवाड,अविनाश जगधने,सचिन शिंगाडे,मिलिंद पट्टेकर,किरण तुपे,बाबा तिवारी,कैलास काळे आदींसह मोठ्या संख्येने महिला व कार्यकते उपस्थित होते.

दरम्यान  राष्ट्रीय भीम सेना भीम आर्मी तर्फे राष्ट्रीय अध्यक्ष आर.आर.पांडियन साहेब व प्रदेशाध्यक्ष अरविंद दादा पवार यांच्या आदेशानुसार औरंगाबाद येथे उत्तरप्रदेश मध्ये सामूहिक बलात्कार करून हत्या केलेल्या पीडितेला न्याय मिळावा या करिता औरंगाबाद येथील क्रांतिचौक येथे निदर्शने करण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष अनुराग इंगोले,उपाध्यक्ष आप्पासाहेब आडे, युवक सहसचिव आशिष जाधव तसेच महिला आघाडी , युवा आघाडी मधील कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

जालना येथेही काँग्रेसतर्फे आंदोलन

संविधान चौक मस्तगढ येथेही  जालना जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे वतीने यूपी हाथरस येथिल मयत मनीषा वाल्मिकी ,जस्टीस फॉर मनीषा अशा घोषणा देत मेणबत्या पेटवून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी वाल्मिकी समाजाचे नगर सेवक महावीर ढक्का सर्व समाज उपस्थित होते यावेळी जिल्हाध्यक्ष दिनकर घेवंदे ,विजय लहाने,विजय बनकर,सुनील भालेराव,अंकुश गाढेकर, विक्रांत ढक्का,पारचा, सोळुंके दादा,फकिरा वाघ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!