Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : ग्रामिण गुन्हे शाखेच्या दोन कारवाया, एक डझन आरोपी अटकेत तर शहर पोलिसांनी घरफोड्यास रंगेहात पकडले

Spread the love

औरंगाबाद – ग्रामीण गुन्हेशाखेने पुण्याहून येणार्‍या सिगारेट वाहतूकी प्रकरणी ९ जणांना कन्नड पोलिस ठाण्याच्या हद्दीत तर तीन जणांना खुल्ताबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत अटक केली.
सिगारेट वाहतूक करणार्‍या प्रकरणात फिर्यादीच आरोपी निघाले महागड्या सिगारेट पुण्याहून जळगावला नेण्यासाठी ट्रक मधे भरल्या होत्या.पण हा मुद्देमाल परस्पर विकून चोरी झाल्याची फिर्याद कन्नड पोलिसांना २३सप्टेंबर रोजी दिली होती. त्यानुसार तपास सुरु असतांना गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भागवत फुंदे यांना खबर्‍याने माहिती दिली की,यातील मालवाहतूक करणारेच परस्पर मालाची विल्हेवाट लावतात.म्हणून त्या दृष्टीने तपास केला असता शनिवारी ३आॅक्टोबर रोजी या प्रकरणातील फिर्यादी पवन भागवत पाटील(३०) त्याचे वडील भागवत पाटील,जळगाव जिल्ह्यातील सतीष परमेश्वर पाटील,राजेंद्राशेळके,रा.पाचोरा शेख तौफिक शेख रफिक , अलीम अतार अहमद अतार , वसीम माजिद बागवान, प्रतिक ललवाणी चौघेही रा.माजलगाव या सर्वांना अटक करण्यात आली आहे.

फिर्यादीचे वडील भागवत पाटील यांच्या सांगण्यावरुन कन्नड टोलनाक्यावर सर्व आरोपी आपापल्या मालवाहतूक करणारी वाहने उभे करुन मध्यरात्री माल लंपास करंत होते. असा प्रकार गुन्हेशाखेच्या तपासात उघंड झाला तर आज गल्लेबोरगाव शावारात उत्तरप्रदेश पासिंग ची खाजगी ट्रॅव्हल्स मधून पावणे दोन लाखांचा गुटखा औरंगाबादेत येत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक फुंदे यांना मिळाली होती. त्यानुसार कारवाई करंत ग्रामीण गुन्हेशाखेने बसचालक कन्हेयालाल लष्करी रा.नेमावर ,मुकेश विश्र्वकर्मा, रा देवास आणि राजा चैनसिंग लोदी रा.इंदोर या मध्यप्रदेशातील आरोपींना १लाख ७२हजारांच्या गुटख्यासहित अटक केले.व त्यांना पीढील तपासासाठी खुलताबाद पोलिसांच्या हवाली केले.वरील कारवाईत पीएसआय भगतसिंग दुलंत, संदीप सोळंके, पोलिस कर्मचारी संजय काळे , विक्रम देशमुख, श्रीमंत भालेराव संजय तांदळे यांनी सहभाग घेतला होता.

रेकाॅर्डवरच्या चोरट्याला घरफोडी करतांनाच पकडले

औरंगाबाद – रेकाॅर्डवरच्या चोरट्याला एमराल्ड सिटी परिसरात घरफोडी करतांना नागरिकांच्या दक्षतेमुळे पुंडलिकनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. शुभम प्रभाकर हिवाळे (२३) रा राजनगर असे अटक चोरट्याचे नाव आहे .तीन दिवसांपूर्वी एस.टी. काॅलनीतून चोरलेली स्कूटर घेऊन शुभम हिवाळे एमराल्ड साटी परिसरात राहणारे किशोर पाटील हे परगावी गेले होते. त्यांचे घरफोडतांना माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या मुलाने पाहिले व वडलांना सांगताच जंजाळ यांनी समय सुचकता दाखवत पुंडलिकनगर पोलिसांना सांगितले.शुभम हिवाळे च्या विरोधात सातारा, जवाहरनगर, सिडको औद्योगिक पोलिस ठाणे, सिडको आणि जिन्सी पोलिस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल झालेले आहेत. एपीआय घन्नशाम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय प्रभाकर सोनवणे, पोलिस कर्मचारी रमेश सांगळे, बाळाराम चौरे, विलास डोईफोडे, राजेश यदमळ, प्रविण मुळे यांनी सहभाग घेतला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!