Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

PuneNewsUpdate : पुण्यात एकाच दिवशी खुनाच्या दोन घटना , एकावर गोळीबार तर दुसऱ्याचा दगडाने ठेचून खून

Spread the love

पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस आयुक्तालयाच्या जवळ अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. विशेष म्हणजे  सोमवारी सकाळपासून घडलेल्या दोन घटनांनी शहर हादरून गेलं आहे.  सकाळी एका गुंडाची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर दुपारी पोलीस आयुक्तालयाच्या जवळच हा गोळीबार झाला. सदर व्यक्ती जिल्हाधिकारी  कार्यालयातून बाहेर येत असताना  बाईकवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि ते पसार झाले. हा अतिशय वर्दळीचा भाग आहे. याच भागात अनेक आंदोलने होत असतात त्यामुळे तिथे कायम पोलीस बंदोबस्तही असतो. अशा भागातच ही घटना घडल्याने गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी पोहोचले असून फरार झालेल्या हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत आहे.

दरम्यान सकाळची पुणे शहरातील खराडी परिसरात एका मोकळ्या मैदानात कुख्यात गुंडाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली.  पहाटेच्या सुमारास ही घटना  घडली.  शैलेश घाडगे (वय 33) असं खून झालेल्या कुख्यात गुन्हेगाराचे नाव आहे. खराडीमधील नैवेद्यम हॉटेल शेजारी मोकळे मैदान असून  या मैदानावर एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असल्याचे स्थानिकांना आढळून आले. स्थानिकांनी तातडीने याबद्दल चंदननगर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता तो मृतदेह कुख्यात गुंड शैलेश घाडगेचा असल्याचे समजले.  पोलिसांनी शैलेशचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. शैलेश घाडगे हा कुख्यात गुन्हेगार होता. त्याच्यावर वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहे. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न करण्याचा गंभीर गुन्हा दाखल आहेत. शैलेश घाडगेची कुणी आणि का हत्या केली याबद्दल अद्याप माहिती मिळाली नाही. पूर्ववैमनस्यातून शैलेशची हत्या झाली असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. चंदन नगर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!