Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

HathrasGangRapeCase : आरोपींच्या बचावासाठी सवर्ण समाजाची बैठक , करण्यात आली हि मागणी , भाजप नेत्याचा पुढाकार

Spread the love

उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यातील सामूहिक बलात्कार आणि हत्येचे प्रकरण गाजत असताना  याच गावात रविवारी हाथरस घटनेत अटक झालेल्या आरोपींच्या समर्थनार्थ रविवारी सर्वणांची बैठक झाली. यावेळी एका आरोपीचे कुटुंबीयही या बैठकीला हजर होते. भाजप नेते राजवीरसिंह पहलवान यांच्या घरी ही बैठक झाली. हाथरस येथे दलित तरुणीवझालेली हि बैठक बातम्यांचा विषय झाली आहे .

दरम्यान भाजपनेते राजवीरसिंह या बैठकीबाबत बोलताना म्हणाले कि , हा एक स्वागत समारंभ होता. सीबीआयच्या चौकशीचे स्वागत करण्यासाठी नागरिक इथे  आले होते. कोणालाही बोलावलेलं नव्हतं . आरोपी लवकुशची आईसुद्धा इथे आली होती, अशी माहिती आहे. अशी कुठलीही बैठक घेऊ नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं होतं. तरीही ही बैठक झाली. दिल्लीतील सफदरसंज रूग्णालयात २९ सप्टेंबरला दलित तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. स्थानिक पोलिसांनी हे प्रकरण ज्या प्रकारे हाताळलं यावरून राज्यातील भाजपच्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारवर जोरदार टीका झाली. पोलिसांनी घाईघाईने रात्री दोन वाजता या पीडित तरुणीवर अंत्यसंस्कार केले. यावेळी पीडितेचे कुटुंबीयही तिथे उपस्थित नव्हतं. यावरून पोलीस आणि राज्य सरकारच्या भूमिकेवर संशय व्यक्त करत अनेक उपस्थित केले जात आहेत.

दरम्यान आम्ही पोलिसांना या बैठकीविषयी माहिती दिली आहे.  पीडितेच्या कुटुंबाविरूद्ध एफआयआर (FIR) दाखल केला जावा. या प्रकरणात आरोपींना लक्ष्य करण्यात आंल आहे, असं बैठकीच्या आयोजकांपैकी एका व्यक्तीने सांगितलं. याआधी शुक्रवारीही सवर्ण जातीच्या लोकांनी महिलेच्या गावाजवळ बैठक घेतली होती. यावेळी, सवर्ण समाजातील नागरिकांनी या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी आणि निर्दोष असलेल्यांना मुक्त करावं, अशी मागणी केली होती.

काँग्रेच्या नेत्यांची कुजबुज

हाथरस प्रकरणी संपूर्ण देश आणि राजकीय पक्ष पीडित कुटुंबीयांच्या बाजूने उभे राहिलेले दिसत असले तरी, उत्तर प्रदेशातील सवर्ण समाज मात्र हाथरस प्रकरणातील आरोपी निर्दोष असल्याचे सांगू लागले आहेत. अशात काँग्रेस पक्षाने या प्रकरणात पीडितांच्या बाजूने उभे राहत अति सक्रियता दाखवल्यामुळे उत्तर प्रदेशातील काँग्रेस पक्षातील सर्वण समाजातील नेते अस्वस्थ झाले असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, बुलंदशहरात काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष निजाम मलिक यांच्या एका व्हिडिओमुळे आगीत आणखी तेल ओतण्याचे काम केल्याचे म्हटले जात आहे. हाथरस प्रकणातील आरोपींचे जो मुंडके उडवेल त्याला एक कोटी रुपयांचे बक्षिस दिले जाईल, अशी घोषणा मलिक यांनी व्हिडिओद्वारे केली आहे. मात्र, काँग्रेस पक्षाची ही अतिसक्रियता पक्षातील अनेक सवर्ण नेत्यांना आवडलेली दिसत नाही. या प्रकरणात काँग्रेसचे सवर्ण नेता उघडपणे काहीही बोलण्यास तयार नाहीत, मात्र काँग्रेसचे पारंपरिक सवर्ण मतदार काँग्रेसपासून दूर जाऊ नये असे त्यांचे ऑफ द रेकॉर्ड म्हणणे आहे.

दरम्यान, भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी हाथरसमधील पीडित कुटुंबाची भेट घेतली. तसंच त्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्याची मागणी त्यांनी केली. तसंच सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखित या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणीही चंद्रशेखर आझाद यांनी केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!