Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

HatharasGangrapeCase : मोठी बातमी : प्रियंकाशी गैरवर्तन झाल्याबद्दल पोलिसांनी मागितली माफी आणि ” त्या ” घटनेच्या चौकशीचे आदेश…

Spread the love

उत्तर प्रदेशाच्या हाथरसला पीडितेच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी जात असताना काँग्रेस नेते राहुल गांधी आणि  प्रियंका गांधी यांना पोलिसांकडून  उत्तर प्रदेश सीमेवर अडविण्यात आले होते. दरम्यान कार्यकर्त्यांवर लाठीमार करणाऱ्या पोलिसांच्या हातून बचाव करण्यासाठी प्रियांका गांधी जेंव्हा पुढे सरसावल्या तेंव्हा त्यांना धक्काबुक्कीही झाली होती.  विशेष म्हणजे एका पोलिसाने त्यांचा कुर्ता हातात धरला असा फोटोही व्हायरल झाला होता. त्या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. त्यानंतर गौतबुद्ध नगर पोलिसांनी त्या घटनेबद्दल प्रियंका गांधी यांची माफी मागितली आहे. त्या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.

दिल्लीहून  शनिवारी दुपारी राहुल आणि प्रियंका गांधी उत्तर प्रदेशच्या हाथरसकडे निघाले होते. या दौऱ्यात प्रियंका या स्वत: ड्रायव्हिंग करत  होत्या. उत्तर प्रदेश सीमेवर पोलिसांनी त्यांची गाडी अडवली. त्यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मोठा जमाव जमला होता. त्यांना पांगविण्यासाठी पोलीस बळाचा  वापर करत होते. त्यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांची धक्काबुक्कीही झाली. ती धक्काबुक्की होत असताना प्रियंका गांधी यांचं लक्ष कार्यकर्त्यांकडे गेलं. पोलीस त्यांच्यावर  लाठीमार असल्याचं पाहून त्या वेगाने पुढे आल्यात आणि बॅरेकेट्स ओलांडत त्यांनी कार्यकर्त्यांचा बचाव केला. दोन दिवसांपूर्वी राहुल गांधीही पोलिसांच्या रेटा रेटीत खाली कोसळले होते. त्यावरूनही पोलिसांच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया येत असतानाच  पोलिसांनी प्रियंका गांधी यांच्याशी जे वर्तन केले त्यावरही देशभर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. हि दृश्ये पाहून प्रियंका यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी भावूक ट्विट करत प्रियंका यांच्या दौऱ्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यांनी म्हटले होते कि , प्रियंका तुझा अभिमान आहे. देशातल्या दु:खी लोकांना न्याय द्यायचा असेल तर हाच ऐकमेव मार्ग आहे. मला आणि सर्व कुटुंबीयांना तुझी आणि देशातल्या लोकांची काळजी वाटते. पण असे अत्याचार रोखण्यासाठी आघाडीवरच जावून लढले पाहिजे .

आपलं सरकार

Click to listen highlighted text!