Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : राष्ट्रवादी काँग्रेसचा LGBT सेल , अध्यक्षपदी प्रिया पाटील

Spread the love

राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षात स्वतंत्र LGBT ( Lesbian, gay, bisexual, and transgender ) सेल निर्माण केला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या नव्या सेलच्या प्रमुख म्हणून प्रिया पाटील यांच्या नावाची घोषणा केली आहे. ट्रान्सजेंडरसह समाजातील इतर घटकांचा समावेश असणाऱ्या LGBT समुदायाला आपल्या हक्कांसाठी अनेकदा संघर्ष करावा लागतो. समाजात त्यांना सन्मानजनक वागणूक मिळत नाही. त्यामुळेच समानतेसाठी हा समुदाय आता एकत्र येत लढा देत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षात LGBT सेलची स्थापना केल्याने आगामी काळात इतर राजकीय पक्षही या समुदयाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करण्याची शक्यता आहे. त्याच्या आधी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या प्रतिनिधींची प्रवक्तेपदी नियुक्ती केलेली आहे.

हा सेल स्थापन करताना LGBT समुदाय आपले हक्क मिळवण्यासाठी जागृत झाला असून त्यांना समानतेची वागणूक मिळायला हवी, अशी भूमिका राष्ट्रवादीने स्पष्ट केली आहे. राष्ट्रवादीचे जयंत पाटील म्हणाले की, निवडणूक काळात करण्यात आलेल्या जाहीरनाम्यानुसार याबाबत आम्ही पाऊल उचलत आहोत. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या खात्याअंतर्गत एलजीबीटी वेलफेयर बोर्डाला प्राथमिकता देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. याद्वारे LGBT समुदायाचा अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यावेळी जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी या सेलच्या नवनियुक्त प्रमुख प्रिया पाटील यांना कामासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

यावर आपली प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे कि , ‘स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्रोत्तर काळातही आजवर समाजाच्या मुख्य धारेपासून शेकडो कोस दूर असणाऱ्या ‘LGTQ’साठी राष्ट्रवादी आपलं हक्काचं राजकीय अवकाश उपलब्ध करुन देत आहे.देशात प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस या समुदायासाठी वेगळा सेल तयार करत आहे. LGBTQ समुदायाच्या न्याय्य हक्कांसाठी,राजकीय व सामाजीक क्षेत्रात स्थान मिळविण्यासाठी हा सेल कार्यरत राहील,अशी आम्हाला अपेक्षा आहे.या सेलच्या अध्यक्षपदी प्रिया पाटील यांची नियुक्ती झाली असून,हा सेल रचनात्मक काम करण्यासाठी कटीबद्ध असेल. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा.’

आपलं सरकार

Click to listen highlighted text!