Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

UttarPradeshNewsUpdate : मुख्यमंत्री योगी म्हणतात , विरोधकांचे दंगली घडवून आणण्याचे षडयंत्र , यांचा विकासाला विरोध आहे…

Spread the love

उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्काराच्या  घटनेवरून योगी सरकारवर  चौफेर टीका होत असताना आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘विरोधी पक्षांचा देशात आणि राज्यात जातीय दंगली घडवण्याचा कट रचत आहेत. होत असलेला विकास त्यांना पचत नाही  दंगली घडल्यास विकास थांबेल. दंगली घडवण्याच्या प्रयत्नात राजकारण असल्याचा आरोप गंभीर आरोप मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.

ज्यांना विकास होतोय हे बरे वाटत नाही . ते जातीय आणि सांप्रदायिक दंगली घडवू इच्छितात . या दंगलीच्या आडून  त्यांना राजकीय पोळ्या भाजण्याची संधी मिळेल त्यासाठी ते नाव नवीन षडयंत्र करीत आहेत. .  यापासून सावध होऊन आम्हाला विकासाकडे जायचे आहे. मुख्यमंत्री योगी एएनआयला आपली प्रतिक्रिया देत होते. संवादाने मोठ्यात मोठी समस्या सुटू शकते आणि नव्या उत्तर प्रदेशात संवाद हेच सर्व समस्या सोडविण्याचे माध्यम आहे . पोलिसांनी महिला आणि अनुसूचित जाती आणि जनजातीशी जोडल्या जाणाऱ्या मुद्यांच्या बाबतीत अधिक संवेदनशील राहायला हवं . आणि सक्रियराहायला हवं अशी योगी यांनी म्हटले आहे. दरम्यान विरोधकांचा दंगली घडवण्याचा कट उधळून लावू आणि विकासाला गती आणखी गती देऊ, असं मुख्यमंत्री योगी म्हणाले. हाथरसमधील कथित सामूहिक बलात्कार प्रकरणावरून विरोधी पक्ष युपी सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी लखनऊ ते दिल्लीपर्यंत युपी सरकारविरोधात निदर्शने केली.

दरम्यान आजही दिल्लीत आणि हाथरसमध्ये आंदोलन चालूच होते . राष्ट्रीय लोक दलाचे जयंत चौधरी हे रविवारी पीडितेच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी हाथरसला गेले. यावेळी पोलिसांनी  लाठीमार केला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेच्या चौकशीसाठी यापूर्वीच एसआयटीची स्थापना केली असून आता या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण ब्युरोकडे ( CBI ) देण्यात आला आहे तरीही आंदोलनाची आग विझायला तयार नाही. पीडितेच्या भावाने या सर्व प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!