Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनाही कोरोनाची लागण

Advertisements
Advertisements
Spread the love

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनाही कोरोनाची लागण झाली असल्याचे वृत्त आहे. दरम्यान त्यांची चाचणी  पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना घरीच क्वारंटाईन केलं असल्याची माहिती देण्यात आली आहे तर त्यांच्या संपर्कात असलेल्या लोकांना अलग ठेवण्याचा सल्ला दिला आहे. कोविडची लागण झाली आहे अशी माहिती प्रमोद यांनी सोशल मीडियावरुन दिली आहे. त्यांनी होम आयसोलेशनचा पर्याय निवडला असून आपल्या संपर्कात आलेल्यांना तपासणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. सध्या मुख्यमंत्री घरातूनच काम पाहणार आहेत.

Advertisements

याबाबत प्रमोद सावंत यांनी केलेल्या  ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘मला कोरोनाची लागण झाली आहे. पण मला कोरोनाची कोणतीही लक्षण नसल्यामुळे मी घरीच क्वारंटाईन झालो आहे. मी घरातून माझे काम सुरू ठेवणार आहे. त्यामुळे जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी’ दरम्यान, कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्या संबंधित उपचार सुरू असून त्यांच्या कुटुंबियांनाही क्वारंटाईन करण्यात आलं असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, प्रमोद सावंत यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा आरोग्य विभागाकडून शोध सुरू आहे. तर ते कोणत्या बैठकीसाठी उपस्थित होते आणि कुठे-कुठे त्यांनी भेट दिली याचीही माहिती गोळा करण्याचं काम सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!