Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

धक्कदायक : उपासमारीने ७ वर्षीय मुलाचा मृत्यू , तीन दिवस आई बसून होती मृतदेहाजवळ … !!

Spread the love

लॉकडाऊननंतर  एका महिला डॉक्टरचे क्लिनिक बंद झाल्यानंतर तिची आणि तिच्या मुलाची उपासमार सुरू झाली. या उपासमारीने त्यांचा ७ वर्षीय मुलगा सॅम्युअल याचा उपासमारीमुळे मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे सदर महिला तब्बल तीन दिवसांपर्यंत मुलाच्या मृतदेहाशेजारी बसून राहिली आणि त्याच्या मृतदेहाला मुंग्या लागू नये म्हणून सतत त्याचा मृतदेह पुसत होती. शेवटी शेजारच्यांना दुर्गंधी आल्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.  हि माहिती मिळाल्यानंतर पोलीस जेंव्हा सरस्वतीच्या घरी गेले तेंव्हा सदर महिला आपल्या मुलाच्या मृतदेहाशेजारी बसली होती. पोलिसांनी तातडीने मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

तामिळनाडूमध्ये चेन्नईपासून नजीक असणाऱ्या तिरुनिंद्रावूरमध्ये हि  धक्कादायक घटना घडली आहे. या विषयी पोलीस निरीक्षक गुनासेकरन यांनी सांगितले की, ते दृश्य पाहून मला आणि माझ्या पथकाला मोठा धक्का बसला. टीमने दरवाजा ठोठावला तेंव्हा सरस्वती यांनी दार उघडलं आणि पोलिसांना मुलाच्या मृतदेहाशेजारी घेऊन गेली आणि पोलिसांना सांगितले की, मी मुलाला  थोड्या वेळासाठीही लांब केलं नाही, नाहीतर त्याला मुग्यांनी खाल्लं असतं. पोलिसांनी सांगितले की, उपासमारीमुळे ंमुलाच्या शरीराची हाडं दिसत होती. टाईम्स ऑफ इंडियाने  यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे.

दरम्यान पोलिसांनी सरस्वती यांच्या कुटुंबीयांशी बातचीत केली तेंव्हा त्यांनी सांगितले की सरस्वती या मानसिक रुग्ण आहेत. ७ वर्षांपूर्वी त्या पती जोस याच्यापासून वेगळ्या राहत होत्या. त्या सीटीएच रोडवरील दुसऱ्या मजल्यावर राहत होत्या. तर पहिला मजला आणि तळमजल्यावर त्यांचे नातेवाईक राहत होते. मात्र त्यांचा कुणाशीही संवाद नव्हता. पतीकडून वेगळं झाल्यानंतर त्यांचं मानसिक आरोग्य खालावलं. त्यांच्या नातेवाईकांसोबत त्यांचा प्रॉपर्टीसंबंधित वादही सुरू आहे. त्या बंगळुरुत राहणाऱ्या आपल्या भावासोबत संपत्तीची केस लढत आहे. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात खूप परिणाम झाला. सरस्वती होमियोपॅथीची डॉक्टर असून  त्यांचं एक क्लिनिकही आहे . त्या लोकांवर उपचार करीत होत्या मात्र दरम्यानच्या काळात लॉकडाऊननंतर त्यांचे क्लिनिक बंद झाले आणि त्यांची उपासमार सुरु झाली त्यात त्यांच्या ७ वर्षीय मुलाचा बळी गेला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!