Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : कोरोना काळात कोणताही धोका नको म्हणून सर्वोच्च न्यायालयाने मोहर्रम मिरवणुकांना परवानगी नाकारली

Spread the love

सर्वोच्च न्यायालयाने  मोहरमनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीलाही कोरोनाच्या पार्शवभूमीवर नकार दिला आहे. याचिकाकर्त्यांनी मोहरम मिरवणूक काढण्यासाठी परवानगी देण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने  जनतेच्या आरोग्याबद्दल धोका घेऊ शकत नाही, असे  सांगत मागणी फेटाळून लावली. त्याचबरोबर एखाद्या ठिकाणी मिरवणूक काढण्याच्या मागणीचा विचार केला जाईल, असे  सांगत याचिकाकर्त्यांना अलहाबाद उच्च न्यायालयात  जाण्याचे सुचविण्यात आले. मोहरम मिरवणूक काढण्यास परवानगी देण्याची मागणी करणारी याचिका लखनौ येथील याचिककर्त्यांनं केली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंठपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयानं याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळून लावत देशभरात मोहरम मिरवणुका काढण्यास नकार दिला. न्यायालय म्हणाले,”जर आम्ही मोहरम मिरवणूक काढण्यास परवानगी दिली तर गोंधळ होईल आणि एका विशिष्ट समुदायाला कोरोनाचा प्रसार केला म्हणून लक्ष्य केलं जाईल. आम्हाला ते नको आहे,” असं न्यायालयानं स्पष्ट केले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!