Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : पूर्वी शस्त्रांच्या कारखान्यांना सरकारी विभागाप्रमाणे चालवले जात होते आता आत्मनिर्भर होण्याची वेळ : पंतप्रधान मोदी

Spread the love

गेल्या कित्येक वर्षांपासून शस्त्रांच्या कारखान्यांना सरकारी विभागाप्रमाणे चालवलं जात होतं .एका मर्यादित दृष्टीकोनामुळे देशाचं नुकसान तर झालं आहेच. याशिवाय तिथे काम करणाऱ्या मेहनती, अनुभवी आणि कुशल कामगारांचंही मोठं नुकसान झालं आहे, सुरक्षा क्षेत्रात सुविधांची निर्मिती करण्यात आत्मनिर्भर होण्याची आमची कटिबद्धता फक्त चर्चा किंवा कागदपत्रांपुरती मर्यादित नाही असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

सुरक्षा परिषदेत पंतप्रधान बोलत होते. या परिषदेत सुरक्षा क्षेत्रात पायाभूत सुविधांमध्ये भारताने आत्मनिर्भर होण्यासंबंधी चर्चा करण्यात आली.  यावेळी बोलताना मोदी पुढे म्हणाले कि , गेल्या अनेक वर्षांपासून या क्षेत्राला विकसित करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. भारतातचं उत्पादव वाढावं, नवं तंत्र भारतात विकसित व्हावं आणि खासगी क्षेत्राचाही या क्षेत्रात जास्तीत जास्त विस्तार व्हावा हे आमचं मुख्य लक्ष्य आहे. यासाठी अनेक महत्त्वाची पाऊलं उचलण्यात आली आहे, अशी माहिती नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिली.

गेल्या बऱ्याच काळापासून देशाच्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफच्या नियुक्तीवर निर्णय होत नव्हता. हा निर्णय भारताच्या आत्मविश्वासाचं प्रतिक आहे, असं नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफच्या नियुक्तीनंतर लष्कराच्या तिन्ही बाजूंनी खरेदीवर योग्य समन्वय साधला जात आहे. खरेदी वाढवण्यात मदत मिळाली आहे. आगामी दिवसांमध्ये स्वदेशी खरेदीवर भर दिला जाणार आहे. आधुनिक उपकरणांमध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या विकसित होणं गरजेचं आहे. सोबतच आज जी उपकरणं तयार केली जात आहेत त्यांची पुढील आवृत्ती तयार करण्यावरही काम करणं गरजेचं आहे. यासाठी डीआरडीओ तसंच खासगी क्षेत्र आणि शैक्षणिक संस्थादेखील काम करत आहेत, अशी माहिती नरेंद्र मोदी यांनी दिली. डिफेन्स कॉरिडोरवर वेगाने काम सुरु आहे. उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू सरकारसोबत मिळून स्टेट ऑफ आर्ट इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं जात आहे. यासाठी आगामी पाच वर्षांमध्ये २० हजार कोटींच्या गुंतवणुकीचं ध्येय ठेवण्यात आलं आहे, असेही नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!