Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : गेल्या 24 तासांमध्ये राज्यात आढळले 8240 नवे रुग्ण, एकूण रुग्णसंख्या 3 लाखाहून अधिक

Spread the love

महाराष्ट्रात आजही कोरोनारुग्णांच्या संख्येत उच्चांकी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 8240 नवे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या ही 3,18,695 एवढी झाली आहे. तर आज 176 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृत्यूची संख्या 12030 एवढी झाली आहे. तर मुंबईत दिवसभरात 1035 एवढी झाली असून एकूण संख्या 1,02,423 झाली आहे.

मुंबईत दिवसभरात 41 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यूची संख्या 5755 एवढी झाली आहे. 5469 रुग्ण बरे होऊन आज घरी गेलेत. आज ठाणे महापालिका क्षेत्रात 255 कोरोणा पॉझिटिव्ह  रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोना बाधितांची संख्या एकूण 16028 झाली आहे

सोमवारी देशात 40 हजार नवे रुग्ण 24 तासांत सापडले. आता खरोखरच देशात या साथीचा कहर झालाय का आणि आता तरी आलेख सर्वोच्च टोकावर  आहे असं म्हणता येईल का? याबद्दल विचारलं असता अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे (AIIMS) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी मुंबई, अहमदाबादमध्ये हे टोक येऊन गेलंय असं म्हणायला वाव असल्याचं सांगितलं.

रणदीप गुलेरिया यांनी सोमवारी कोरोनाची साथ, प्रतिकारशक्ती, लस (COVID Vaccine) यासंदर्भात माहिती द्यायला माध्यमांशी संवाद साधला. त्या वेळी भारतात या साथीच्या उद्रेकानं टोक गाठलंय आणि आता साथ उतरणीला लागणार का असं विचारता ते म्हणाले, “काही भागांत Covid ने सर्वोच्च शिखर (Peak)  गाठलंय असं म्हणता येईल. दिल्ली, मध्य मुंबई, अहमदाबाद या भागात साथीचा आलेख थोडा उतरणीला लागला आहे. देशात इतरत्रही साथीने सर्वोच्च टोक गाठून झालेलं असल्याची शक्यता आहे.”

राज्याचा मृत्यूदर 3.77

राज्यात दिवसभरात 176 करोना रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे  कोरोनाबळींचा आकडा आता 12 हजार 030 पर्यंत पोहोचला आहे. राज्याचा मृत्यूदर 3.77 इतका आहे. सध्या राज्यात 7 लाख 65 हजार 781 जणं होम क्वारंटाइन आहेत तर 45 हजार 434 व्यक्ती संस्थांत्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात नोंद झालेले 176 मृत्यू हे मुंबई मनपा-41, ठाणे-5, नवी मुंबई मनपा-11, कल्याण-डोंबिवली मनपा-11, उल्हासनगर मनपा-6,वसई-विरार मनपा-2, रायगड-4,पनवेल-2,नाशिक मनपा-2, धुळे मनपा-1, जळगाव-18, जळगाव मनपा-3, पुणे-9, पुणे मनपा-22, पिंपरी-चिंचवड मनपा-11,सोलापूर-1, सोलापूर मनपा-4, सातारा-2, कोल्हापूर-4, सांगली-4,औरंगाबाद मनपा-3, जालना-1,लातूर-2, नांदेड मनपा-2, अमरावती-1, अमरावती मनपा-1, बुलढाणा-2, वर्धा-1 या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील तर इतर राज्य 1 अशी नोंद आहे.

राज्यातील करोनाबाधितां रुग्णांचा आकडा चिंता वाढवणारा असला तरी करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढताना दिसत आहे. त्यामुळं थोडा दिलासा मिळाला आहे. आज 5 हजार 460 जणांनी करोनावर यशस्वीपणे मात केली आहे. आजपर्यंत एकूण 1 लाख 75 हजार 029 जण सुखरुप घरी परतले आहेत. त्यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 54.92 टक्के आहे. तर, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 16, 00, 667 चाचण्यांपैकी 3 लाख 18 हजार 695 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

पुणे शहरातील करोनारुग्णांच्या मृत्युसंख्येने रविवारी एक हजाराचा टप्पा पार केला. पुणे महापालिका हद्दीत 22 रुग्णांचा मृत्यू झाला असून, पुणे शहरातील एकूण मृत्युसंख्या 1391 इतकी आहे. मुंबई महापालिकेच्या हद्दीत आजपर्यंत एकूण 5 हजार 755 मृत्यूंची नोंद झाली असून, मुंबईनंतर चार अंकी आकडा गाठणारे पुणे हे राज्यातील दुसरे शहर आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

पुणे शहरातील करोनारुग्णांच्या मृत्युसंख्येने रविवारी एक हजाराचा टप्पा पार केला. पुणे महापालिका हद्दीत 22 रुग्णांचा मृत्यू झाला असून, पुणे शहरातील एकूण मृत्युसंख्या 1391 इतकी आहे. मुंबई महापालिकेच्या हद्दीत आजपर्यंत एकूण 5 हजार 755 मृत्यूंची नोंद झाली असून, मुंबईनंतर चार अंकी आकडा गाठणारे पुणे हे राज्यातील दुसरे शहर आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!