Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : औरंगाबाद पोलीस आणि एन्काऊंटरचे गाजलेले ४ खटले….

Spread the love

जगदीश कस्तुरे । क्राईम विशेष


२००० साला पासून  २०१२ पर्यंत हे चार एनकाऊंटर घडले आहेत.२०१२ नंतर आलेल्या पोलिस आयुक्तांच्या काळात अशा घटना घडल्या नाहीत तत्कालीन गुन्हेशाखा पोलिस निरीक्षक जेम्स अंबिलढगे,यांनी दोन एनकाऊंटर केले,तर पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे,यांनी २००४साली आंबेडकरनगरात एक एनकाऊंटर केला.त्यानंतर २०१२ साली एटीएस औरंगाबादने हिमायतबाग परिसरात सिमी या अतिरेकी संघटनेचे तीन अतिरेकी औरंगाबादेत आले असतांना झालेल्या एनकाऊंटर मधे एका अतिरेक्याचा खातमा करण्यात आला.समाजाला घातक असलेल्या गुन्हेगारांचे एनकाऊंटर केल्यानंतर पोलिस अधिकार्‍यांना समाजातल्या विविध घटकांशी तोंड देता देता नाकी नउ आले होते. पण तत्कालीन पोलिस निरीक्षक जेम्स अंबिलढगे, पोलिसउपनिरीक्षक सुरेंद्र माळाळे, पोलिस अधिक्षक नविनचंद्र रेड्डी यांच्या पाठीशी सशक्त(कर्तव्याने) वरिष्ठ पोलिस अधिकारी होते.

जेम्स अंबिलढगे यांच्या पाठीशी पोलिसआयुक्त विष्णूदेव मिश्रा होते. तर पीएसआय सुरेंद्र माळाळे यांच्या पाठीशी तत्कालिन गुन्हेशाखा पोलिस निरीक्षक मधुकर औटे आणि पोलिसआयुक्त विष्णूदेव मिश्राच होते.तर पोलिस अधिक्षक नविनचंद्र रेड्डी यांच्या पाठीशी अतिरिक्त पोलिस महासंचालक राकेश मारिया होते.२०००साली वाळूज पोलिस ठाण्याच्या हद्दीत जित्या पोपट काळे या दरोडेखोराची गॅंग वस्त्या वस्त्यावर जाऊन शेतात राहणार्‍या लोकांना शंभर दोनशे रुपयांसाठी मारहाण करायचे कान नाक कापायचे जित्या काळेच्या टोळीला जेरबंद करण्याचे आदेश पोलिसआयुक्तांनी दिल्यानंतर पोलिसनिरीक्षक जेम्स अंबिलढगे, तत्कालिन एपीआय शिवा ठाकरे, वाळूज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वजाळै यांच्यासह येसगाव टेकडीवर जित्या काळैच्या टोळीला कोंडीत पकडले.आपण पुरते अडकल्याचे लक्षात येताच जित्याने पोलिसनिरीक्षक अंबिलढगेंवर तलवारी ने वार करुन जखमी केले.व गावठी कट्टा रोखला त्यामुळे नाईलाजाने जित्याच्या पायावर अंबिलढगेंने गोळी चालवून त्याला जायबंदी केले.व घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तो मरण पावला.पण त्त्यानंतर शहरातले वातिवरण पोलिसांच्या विरोधात चांगलैच पेटले.डाव्या आघाडीच्या लोकांनी पोलिस निरीक्षक अंबिलढगेंवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. वाळूज परिसरातील काही लोकांनी तर आरोप केला की, मयत आरोपी जित्याच्या बहीणीशी जेम्स अंबिलढगेंचे प्रेमसंबंध होते.म्हणून अंबिलढगेंनी जित्या काळेचा काटा काढला.या आरोपांचा अंबिलढगेंना बर्‍याच ठिकाणी सामना करावा लागला.

२००० च्या आधी सहाय्यक पोलिसआयुक्त सदानंद वायसेपाटील यांच्या पथकाने लोकांना लूटमार करून दहशत निर्माण करणार्‍या शिकलकर्‍याला पकडण्यास जातांना शहानूरमियाँ दर्ग्याजवळ त्याचा खात्मा करण्यात आला.  त्यानंतर १४ मे २००४ साली गुन्हेशाखेने सिडको परिसरातील घरफोड्या विलास शहाजी सुरडकर याला पकडण्यासाठी सापळा रचला यावेळी कारवाई मधे गुन्हेशाखा पोलिसनिरीक्षक मधुकर औटे, पीएसआय सुरेंद्र माळाळे यांनी आंबेडकरनगरात सुरडकरला घेरले. पोलिस आपल्याला पकडायला आल्याचे पाहाताच सुरडकर घरातून तलवार घेऊनच बाहेर पडला.त्याची पत्नी आणि मुलगा किंवा भाचा त्याला पोलिसांवर चाल करुन जाऊ नको असे सांगत असतांनाच त्याने दोघांनाही जखमी केले. व सुरडकरने केलेल्या हल्ल्यात पीएसआय माळाळे सह सात पोलिस जखमी झाले.त्यामुळे गुन्हेशाखेने दिलेल्या प्रत्युत्तरात विलास सुरडकर मारला गेला.

दि .  २६ मार्च २०१२ या दिवशी सकाळी ११ते १च्या दरम्यान ही घटना घडली एटीएस कडे माहिती होती.की, सिमी या अतिरैकी संघटनेचे तीन अतिरेकी हिमायतबाग परिसरात येत आहे.एटीएस चे पोलिस अधिक्षक नविनचंद्र रेड्डी यांनी पोलिस निरीक्षक शिवा ठाकरे यांना पथकासह घटनास्थळी जाण्याचे आदेश दिले होते.त्याचवेळी पोलिस निरीक्षक ठाकरेंनी विनंती केली की तुम्हीही सोबंत राहा आम्हाला आणखी बळ मिळैल असं म्हणंत रेड्डी यांना सोबंत येण्याचा आग्रह केला. खबर्‍याने दिलेल्या माहिती नुसार अजहर कुरेशी, मोहम्मद अब्रार अलियास खलील खिलजी इलियास शाकेर अशे तीन आरोपी हिमायतबाग परिसरात आल्याचे पोलिस निरीक्षक शिवा ठाकरेंनी ओळखले त्यांना पोलिसांना शरण येण्याचे आदेश दिले.पण आदेश ऐकताच अजहर कुरेशी ने एटीएस अधिकार्‍यांवर गोळीबार केला. त्यामधे पोलिस काॅन्सटेबल आरेफ इस्माईल यांच्या डाव्या खांद्याला गोळी लागली. प्रत्युत्तरादाखल पोलिस अधिक्षक नविनचंद्र रेडडी यांनी अजहर कुरेशीला जागेवरंच ठार केले.तर शिवा ठाकरेंनी झाडलेल्या फैरीत खलील खिलजी इलिआस शाकेरच्या पायाला गोळी लागली व अबरारला अटक करण्यात आली. एनकाउंटर झाल्यावर पोलिसआयुक्तालयातील काही अधिकार्‍यांनीच रेड्डी यांच्या कारवाई बद्दल शंका व्यक्त करायला सुरुवात केली.

आता औरंगाबादेत हिंदू मुस्लीम दंगे होतील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल असे अंदाज बांधू लागले.पोलिसांचे आपापसातील हेवेदावे पाहुन काही सामाजिक संघटना, कट्टरपंथी मुस्लीम संघटनांनी रेड्डींवर बोगस एनकाऊंटर केल्याचे आरोप केले.रेड्डींवर खुनाचा गुन्हा दाखल करा अशीही मागणी केली.तरीही रेड्डी यांनी न डगमगता तथाकथित मुस्लीम संघटनांच्या नेत्यांना आरोपींशी चर्चा करण्याची परवानगी दिली.आणि त्या संघटनांनी निर्लज्जपणे आरोपींशी सुसंवाद साधला.पण जेंव्हा अटक आरोपी अबरार हा शहरातील मुस्लीम नेत्यांना जिहादचे धडे देऊ लागला तेंव्हा अबरार आणि त्याचे साथीदार खरंच अतिरैकी असल्याची खात्री पटली. या प्रकरणात रेड्डींची सी.आयडी. , सीबीआय चौकशीही झाली. पण रेड्डींनी आणि ठाकरे यांनी केलेल्या कामगिरी मुळे आरोपींना १०वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा झाली. सिमी या अतिरेकी संघटनेचा खातमा झाला असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.पोलिस अधिक्षक नविनचंद्र रेड्डींनी नक्सलाईट भागात काम केलेले आहे. इंटलिजन्स मधे काम केलेले आहे.आणि सगळ्यात मुख्य म्हणजे एडीजी राकेश मारिया त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!