Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadLatestUpdate : औरंगाबाद शहरात 20 मे पर्यंत लॉकडाऊन, कडक अंमलबजावणीचे प्रशासनाला निर्देश

Spread the love

औरंगाबाद शहरातील कोरोनाचा वाढत उद्रेक लक्षात घेता  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि संसर्गाची साखळी तोडण्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी औरंगाबाद शहरामध्ये 20 मे बुधवार पर्यंत लॉकडाऊन जाहिर केला आहे. या लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देशही जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन आणि पोलिस प्रशासनाला विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी यावेळी दिले.
शहरात पोलिस प्रशासनाकडून कंन्टेनमेंट झोनमध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. कंन्टेनमेंट झोनमधून नागरिकांचे बाहेरील भागात तसेच बाहेरील भागातील नागरिकांचे कंन्टेनमेंट झोनमध्ये होणारी आवागमन बुधवार पर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश पोलिस प्रशासनाला दिले आहेत. लॉकडाऊनच्या काळात कंन्टेनमेंट झोनमध्ये जिवनावश्यक वस्तुंचा तुटवडा होणार नाही याबाबत खबरदारी घेण्याच्या सुचना संबंधित यंत्रणांना देत नागरिकांनीही सहकार्य करुन कोरोनाची साखळी तोडण्यास मदत करण्याचे आवाहन विभागीय आयुक्तांनी यावेळी केले.

औरंगाबाद शहरात आज दुपारी 28 कोरोनाबाधितांची वाढ झाली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 900 झाली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
औरंगाबाद शहरातील आता आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या)
कैलास नगर (1), चाऊस कॉलनी (1), मकसूद कॉलनी (2), हुसेन कॉलनी (4), जाधववाडी (1), न्यू बायजीपुरा, गल्ली नं.3 (1), एन सहा, संभाजी कॉलनी, सिडको (1), कटकट गेट (1), बायजीपुरा (10), अमर को- ऑपरेटिव्ह सोसायटी, एन आठ, सिडको (2), लेबर कॉलनी (1), जटवाडा (1), राहुल नगर (1) आणि जलाल कॉलनी (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 16 पुरुष आणि 12 महिला रुग्णांचा समावेश असल्याचेही त्यांनी कळविले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!