Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : कोविडमुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी प्रयत्न करा – विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर

Spread the love

औरंगाबाद  शहरात कोविडमुळे आत्तापर्यंत 25 जण मृत्युमुखी पडले आहेत. या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक रुग्णांची केसस्टडी करुन मृत्युदर आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणेने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सांगितले. विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास भेट दिली. यावेळी घाटीच्या अधिष्ठाता, डॉ.कानन येळीकर, डॉ.कैलास झिने, डॉ.कैलास चिंतले या चर्चेत उपस्थित होते.
विभागीय आयुक्त यांनी मागील काही दिवसांपासून कोविड विषाणु बाधित व्यक्तीच्या मृत्यू बाबत सखोल आढावा घेतला त्यांनी कोविड मुळे मृत्यू बाबत चिंता व्यक्त केली. सदरील आढावावरुन असे लक्षात आले की, त्यातील 3 कोविड बाधित व्यक्तींचे मृत्यू हे या संस्थेत दाखल झाल्यापासून दोन तासाच्या आतच उपचारा दरम्यान मृत्यू झाला, यावरुन असे दिसते की त्यांना या संस्थेत दाखल करतेवेळी त्यांची स्थिती गंभीर होती. तसेच आणखी दोन कोविड बाधित मृत्यू पावलेल्या रुग्णांपैकी एका रुग्णांचे वय 70 व एका रुग्णाचे वय 74 असे होते. तसेच या दोन रुग्णांना डायबिटीस, ब्लड प्रेशर, हायपरटेंशन, फुफुसांचा जुना आजार व एका रुग्णाला मधुमेहा सोबत मानसिक आजाराचा त्रासाने ग्रस्त होते. त्यामुळे असे कोविड बाधितांचे जे मृत्यू होतात त्यांचे सरासरी वय वर्ष 60पेक्षा जास्त होते व इतर आजाराने ते ग्रस्त होते.
मागील चार दिवसापूर्वी कोविड  करीता प्रसिध्द झालेल्या आंतरराष्ट्रीय लॅनसेटजर्नलमधील आर्टिकलनुसार त्यांनी सुचविलेली औषधे कशी व कोठून प्राप्त होतील याबाबत माहिती घेण्यात येण्याबाबत निर्देश दिले व लॅनसेटनुसार interferon beta-1b, lopinavir-ritonavir, ribavirin अशी चार औषधे देण्यास हरकत नाही असे सांगीतले. यासंबंधी आयसीएमआर रिसर्च प्रोजेक्ट तयार करण्या बद्दल सूचित केले याबाबत अधिष्ठाता डॉ कानन येळीकर म्हणाल्या की, जे पाच प्रोजेक्ट आयसीएमआर येथे सादर केलेले आहेत ते मान्य होतील व त्याअनुषंगाने नवीन औषधी प्राप्त होतील. यावेळी विभागीय आयुक्तांनी कोविड स्वॅब तपासणी बाबत जिल्हाधिकारी,  आयुक्त महानगरपालिका ,जिल्हा शल्यचिकित्सक यांनी एकत्रित बैठक घेऊन त्यावर चर्चा करुन मार्गदर्शन सूचना  देण्यात याव्यात असेही यावेळी सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!