Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : परप्रांतीय प्रवासी मजुरांची पोलीस आणि एसटी महामंडळाने केली पाठवणी , लायन्स क्लबच्या राहत केंद्राची मोठी कामगिरी….

Spread the love

लायन्स क्लब मिडटाउनतर्फे तापडिया कासलीवाल प्रांगण अदालत रोड येथून एसटी महामंडळाच्या वतीने परप्रांतीय प्रवासी मजुरांसाठी आतापर्यंत सुमारे ५० बस मधून महाराष्ट्र शासनाच्या खर्चाने सुमारे १००० ते १२०० लोकांना सोशल डिस्टंसिंगचे पालन  करून त्यांच्या राज्यात पाठविण्यात आले . गेल्या तीन दिवसांपासून हे कार्य चालू आहे. काल रात्री  आणि आज सकाळ पासून परप्रांतीयांचे जत्थेच्या जत्थे  लायन्स मिडटाऊनच्या राहत सहायता केंद्रात दाखल होत होते. काल सुमारे 19  एस टी  बसेस च्या माध्यमातून आणि बलिया आणि उन्नाव येथे गेलेल्या ट्रेनच्या माध्यमातून सुमारे 800 परप्रांतीय आणि आज सकाळ पासुन सुमारे 23 एसटी  बसेस तसेच आग्रा ट्रेन  च्या माध्यमातून आज सुमारे 800 परप्रांतीय नागरिकांची  मध्यप्रदेश उत्तरप्रदेश , छत्तीसगढ़, तेलगाना आदि ठिकाणी रवानगी करण्यात आली .

 

या  सर्व नागरिकांसाठी लायन्स क्लब मिडटाउनच्या  पुढाकाराने जेवण , नाष्टा ,पाणी ,  चहा ,बिस्कुट आदिची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी  सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलच्या एका पथकाने या प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर प्रवासाला जातानासुद्धा  या सर्व प्रवासी नागरिकांना  सोबत भोजन ,पाणी  ,मास्क ,गमछे , औषधी आदि सुविधा पुरविण्यात आल्या. यावेळी  स्वतः पोलीस आयुक्त आयुक्त चिरंजीव प्रसाद , डी. सी. पी.  मीना मकवाना , डी. सी. पी.  खटमोड़े पाटिल , पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी , यांची उपस्थिती होती.  त्याच बरोबर  एस टी महामंडळाचे विभाग नियंत्रक अरुण सिया,  विभागीय  वाहतूक अधिकारी अमोल अहिरे ,  आगर प्रमुख २ चे सुनील शिंदे , आगर प्रमुख १ चे अमोल भुसारी, प्रदीप गायकवाड़, वाहतूक पर्यवेक्षक किशोर बत्तिसे,  वाहतूक निरीक्षक डी. एस बिराजदार, एम एम पाणपाटील, एल डी शाह वाहन निरीक्षक, डी एस  पडोल सहायक वाहन निरीक्षक, मोहम्मद सलीम राजा वाहतूक नियंत्रक,अविनाश पाटिल मोटर वाहन निरीक्षक, मगरे साहेब सहायक मोटर वाहन निरीक्षक यानी या प्रवाशांची व्यवस्था केली .

या प्रसंगी एस टी महामंडळाचे  सर्व वाहन चालक, सर्व कर्मचारी , अधिकारी याना आनंद विजयकुमार पाटनी यांचे तर्फे N 95 मास्क वितरित करण्यात आले आहेत, आज या राहत शिबिराला राज्यसभेचे खासदार डॉ भागवत कराड़ ,  शिवसेना नेते चंद्रकांत खैरे , महापौर नंदकुमार घोडले यानी ही या राहत शिबिराला भेट दिली . यावेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे यानी स्वतः सर्व नागरिकांना भोजन वाटप केले, या सर्व कार्यासाठी लायन्स क्लबचे सदस्य ” भूखा  न जाये कोई , पैदल ना जाये कोई…”  हे  उद्दिष्ट ठेवून  कार्य करत आहेत.  यामध्ये लायन्स क्लब मिडटाउनचे चंद्रकांत मालपाणी , महावीर पाटणी, कुलभूषण जैन, शेखर देसरडा , सुनीता देसरडा, संजय कासलीवाल, रामेश्वर भारूका , राजेन्द्र माहेश्वरी , अनिल मुनोत, कमलेश धूत, गौरव मालपाणी ,भूषण मालपाणी, लौकिक कोरगावकर, प्रशांत गांधी , संजय मंत्री आदि सह सर्व पदाधिकारी आदींचा सहभाग होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!