Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusEffect : राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यासह ३९० पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोना , ४ मृत्यू, एसआरपीएफच्या २२ जवानांनाही लागण

Spread the love

राज्यात सुरु असलेल्या कोरोनाविरुद्धच्या लढाईत डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांबरोबरच पोलिसांचीही  मोठी भूमिका असून त्यांच्याकडे कोरोनापासून बचाव होण्यासाठी कोणत्याही विशेष सुविधा नसल्यामुळे पोलीस आणि एसआरपीएफच्या जवानांनाही मोठ्या प्रमाणात कोरोनाची लग्न होत असल्याचे चित्र आहे. दरम्यान आतापर्यंत ३९० पोलिसांना कोरोना झाला असून त्यापैकी १५० पोलीस एकट्या मुंबईतील आहेत. यापैकी ६ वरिष्ठ अधिकाऱ्यांना तर आज मुंबईतील एका आयपीएस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली असल्याचे वृत्त आहे. कोरोनामुळे बंदोबस्तादरम्यान कोरोनाची लागण झाल्यामुळे ४ पोलिसांचा मृत्यू झाला असून त्यापैकी तीन मुंबईचे तर एकाच पुण्यात मृत्यू झाला.

दरम्यान पोलिसांवरच सुरक्षेचा ताण आता वाढला असून आरोग्य रक्षकांना मदत करण्यापासून त्यांना सुरक्षा देण्यापासून ते  गरजूंना  आणि गरिबांना धान्य पोहोचविण्यापर्यंत अशी अनेक कामे पोलिसांना विश्रांती न घेता करावी लागत असल्यामुळे  पोलिसांना मोठी कसरत कारवाई लागत आहे .  त्यातच  परप्रांतीय  मजुरांचा प्रश्न निर्माण झाल्याने गर्दीला हटवितांना पोलिसांवर ताण येतोय. कायम लोकांच्या संपर्कात राहिल्याने मुंबईतल्या आणखी ५४ पोलीस अधिकाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे वृत्त आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या ५४ कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. हे सर्व जण जे जे पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी आहेत. त्यामुळे जे जे पोलीस स्टेशन सॅनिटाईज करण्यात आलं आहे. याशिवाय मुंबई पोलीस दलातील एका आयपीएस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली असून त्यानंतर पोलीस उपायुक्त कार्यालयातील १५ जणांना क्वॉरन्टाईन करण्यात आलं आहे. राज्यात एकूण ३९० पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आहेत.

एसआरपीएफच्या २२ जवानांनाही कोरोनाची लागण

याशिवाय मुंबई आणि मालेगाव येथे बंदोबस्त करून परतलेल्या एसआरपीएफच्या जवानांनाही कोरोनाची लागण होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. हिंगोलीमध्ये गेल्या २४ तासांत ३७ रुग्णांची वाढ झाली आहे. पुन्हा १४ एस.आर.पी.एफ जवानांचा तपासणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता ८९ वर पोहोचली आहे. मालेगाव आणि मुंबईत बंदोबस्ताला गेलेल्या हिंगोलीतील जवानांचे टप्प्याटप्प्याने अहवाल येत आहेत. हे सर्व जवान मुंबई आणि मालेगावच्या हॉटस्पॉटमध्ये बंदोबस्तांवर होते. त्यातील १९४ पैकी हिंगोलीच्या ४६ तर जालन्याच्या एका अशा ४७ जवानांना करोनाची लागण झाली होती. आज नव्याने प्राप्त झालेल्या अहवालानुसार १९४ जवानांपैकी २२ जवानांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. एकूण बाधित जवानांपैकी ३४ जवान मालेगाव तर ३५ जवान मुंबई येथून कर्तव्य बजावून आले होते. तर उपचार करणाऱ्या परिचारिकेला प्राथमिक लक्षणे आढळून आल्यानंतर तिचे स्वब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. अहवाल आल्यानंतर तिलाही करोनाची लागण झाल्याचं आढळून आले आहे. विशेष बाब म्हणजे सुरुवातीस बाधित आढळलेल्या जवानांचा १४ दिवसानंतरचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या पूर्वी एका रुग्णाने करोनावर मात केल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. ४ जवानांना मधूमेह व उच्चरक्तदाब असल्याने त्यांना औरंगाबादला पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

 

150 | 390 | 6 adhikari  | 4 death | 3 in Mumbai

आपलं सरकार

Click to listen highlighted text!