Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusEfeect : हा विनोदाचा विषय नाही , खरोखरच दारूड्यांमुळे राज्य सरकारला मिळतात “इतके: हजार कोटी व्हाईट, ब्लॅकचे पोलीस जाणतात…….

Spread the love

दारुडे लोक राज्याची आणि देशाची अर्थव्यवस्था मजबूत करतात म्हणून त्यांचे टाळ्या आणि थाळ्या वाजवून स्वागत झाले पाहिजे अशा विनोदी पोस्ट सोशल मीडियावर गमतीने व्हायरल केल्या जात असल्या तरी वस्तुस्थिती तशीच आहे. राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात दिवसाला २४ लाख लिटर दारुचं सेवन होतं तर २०१९-२०  या आर्थिक वर्षात राज्याला दारुतून १५ हजार ४२८ कोटी महसूल मिळाला होता. याशिवाय वर्षाला राज्यात ८६.७ कोटी लिटर दारुचं सेवन केलं जातं.  त्यात ३५ कोटी लिटर देशी दारु, २० कोटी लिटर विदेशी दारु, ३१ कोटी लिटर बिअर आणि ७० लाख लिटर वाईनचा समावेश आहे.


देशभरात लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाल्यानंतर आणखी एका गोष्टीची चर्चा सर्वत्र होत आहे ती म्हणजे दारूची . देशभरात करोडो रुजप्यांची दारू लोकांनी विकत घेतल्या असल्या बातम्या सोशल मीडियावर चांगल्याच व्हायरल झाल्या होत्या विशेष म्हणजे कर्नाटक आणि केरळमधील ५८ आणि ९५ हजाराची दारू खरेदीची बिलेही सोशल मीडियावर फिरत होती. शासन निर्णयायानुसार काल ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोनमधील कन्टेंन्मेंट क्षेत्र वगळता मद्यविक्रीला सुरुवात झाली. महाराष्ट्रात  काल तीन ते चार लाख लिटर दारुची विक्री झाल्याचा अंदाज असल्याची माहिती उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली. एबीपी माझाने य बाबत वृत्त दिले आहे . या वृत्तानुसार कांतीलाल उमाप म्हणाले की, “एरव्ही राज्यात दिवसाला २४ लाख लिटर दारुचं सेवन केलं होतं. राज्यात कालपासून मद्यविक्रीला सुरुवात झाली. तरीही काल सगळीकडे दारुची दुकानं सुरु केलेली नव्हती. अजूनही काही जिल्ह्यात विक्रीला सुरुवात झालेली नाही. राज्यात काल तीन  ते चार लाख लिटर दारुची विक्री झाल्याचा अंदाज आहे. रुपयात बोलायचं झाल्यास १० ते ११कोटी रुपयांची दारु विकल्याचा अंदाज आहे.

राज्यभरातच नव्हे तर देशभरात दारु खरेदीसाठी झालेली गर्दी आणि नियमांचं उल्लंघन या पार्श्वभूमीवर दिल्लीत मद्याच्या एमआरपीवर ७० टक्के विशेष कोरोना शुल्क आकारण्याचा निर्णय अरविंद केजरीवाल सरकारने घेतला आहे. यासंदर्भात कांतीलाल उमाप म्हणाले की, “महाराष्ट्रात मद्यावरचा कर हा देशात सगळ्यात जास्त आहे. दिल्लीने कर वाढवला तरी तो आपल्यापेक्षा कमी आहे. कर वाढवणे हा धोरणात्मक निर्णय आहे.”

लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावेत : उत्पादन शुल्क आयुक्त

दारुची दुकानं सुरु झाल्यानंतर सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्याची अट असतानाही अनेक ठिकाणी सगळे नियम पायदळी तुडवले होते. मद्यप्रेमींनी दुकानाबाहेर गर्दी केली. त्यामुळे दारुची दुकानं सुरु करण्याच्या निर्णयावर पुन्हा एकदा विचार करण्याची मागणी सरकारकडे केली जात आहे. त्याबाबत उत्पादन शुल्क आयुक्तांनी लोकांना सोशल डिस्टन्स पाळण्याचं आणि खबरदारी घेण्याचं आवाहन केलं. “लोकांनी काळजी घ्यावी, कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करावं. दुकानदार आणि तिथल्या लोकांना त्रास होऊ नये याची खबरदारी घ्यावी,” असं ते म्हणाले. तसंच दुकानदारांनीही काळजी आणि खबरदारी घेण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं.

लॉकडाऊनमुळे गेल्या ४०  दिवसांपासून बंद असलेली दारुची दुकानं आज उघडली आणि मद्यप्रेमींनी नुसत्या उड्या टाकल्या. सकाळपासूनच सगळ्या नियमांची ऐसीतैसी करत देशभर दुकानांसमोर रांगा लागल्या होत्या. ही गर्दी एवढी वाढली की अनेक ठिकाणी पोलिसांना लाढीचार्ज करावा लागला. कर्नाटकमध्ये 9 तासांमध्ये तब्बल 45 कोटींची दारु विकल्या गेली. ही माहिती उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे. दारुची दुकानं उघडण्याचा आजचा पहिलाच दिवस होता. मात्र लोकांनी गर्दी केल्याने अनेक ठिकाणी या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी होत आहे. तर काही ठिकाणी हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. आज ३.९ लाख लीटर ​बीयर (Beer Sales) आणि ८.५ लाख लीटर इंडियन मेड लिकर (IML) म्हणजेच देशी दारुची विक्री झाल्याची माहितीही उत्पादन शुल्क विभागाने दिली.

ऐकावे ते नवलच !! जप्त केलेल्या दारूच्या पेट्या विकल्या आणि ते तुरुंगात गेले ….

दरम्यान, उत्तर प्रदेशातील मथुरा येथून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. मथुरामधील एका पोलीस चौकीचे प्रमुख आणि ३ जवानांनी मिळून ५८२२ दारूच्या पेट्या बाजारात विकल्या. या दारुच्या पेट्या पोलिसांनी विविध ठिकाणांहून जप्त केल्या होत्या. या दारूची किंमत कोटींमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात एसएसपी यांनी पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करीत त्यांची रवानगी तुरुंगात केली आहे. एका स्टिंग ऑपरेशनमध्ये स्वत: एसएसपी यांनी या प्रकरणात खुलासा केला आहे. यामध्ये एका दारू माफियाचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!