Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : दुःखद बातमी : पुण्यात ११ वर्षीय मुलासह तिघांचा मृत्यू तर आणखी दोन चिमुकल्यांसह नऊ जण करोनाबाधित

Spread the love

राज्यात कोरोनाचा कहर चालूच असून पुणे जिल्ह्यात आज कोरोनाच्या संसर्गाने तीन जणांचा मृत्यू झाला आहे, यामध्ये ११ वर्षीय चिमुकल्याचाही समावेश आहे. यामुळे पुणे विभागातील मृतांचा आकडा ११८ वर पोहोचला. तर कोरोनाबाधितांची एकूण संख्या २,१३१ वर पोहोचली आहे, अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. कोरोनाच्या विषाणूनं पुणे शहराला हैराण केलं आहे. दीड महिन्यांपासून शहरातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढतच आहे. दुसरीकडं मृतांची वाढणारी संख्या प्रशासनाच्या चिंतेत दररोज भर टाकत आहे. पुणे जिल्ह्यात आणखी तिघांचा करोनाचा संसर्ग झाल्यानं मृत्यू झाला असून, काळजीची बाब म्हणजे यात ११ वर्षांच्या मुलाचा समावेश आहे.

राज्यात मुंबईपाठोपाठ पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये चिंताजनक परिस्थिती आहे. करोनामुळे अनेक वसाहती कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाकडून लॉकडाउनची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. मात्र, करोनाचा संसर्ग अनेकांना होत आहे. त्यात काळजीची बाब म्हणजे पुणे शहर आणि जिल्ह्यातील मृतांची संख्याही दिवसेंदिवस वाढ लागली आहे. मंगळवारी पुण्यात आणखी तिघांचा करोनाची लागण झाल्यानं मृत्यू झाला आहेत. यात एका ११ वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. तीन मृत्यूमुळे करोनामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या ११८ वर गेली आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात सध्या २ हजार १३२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, पुण्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली आहे. दरम्यान पिंपरी-चिंचवड शहरात आणखी नऊ जण करोना बाधित आढळले असून, यात दीड महिन्याच्या चिमुकलीचा आणि चार वर्षाच्या बाळाचा समावेश आहे. त्यांच्यावर महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहरातील करोना बाधितांची एकूण संख्या १३२ वर पोहचली आहे. आत्तापर्यंत ५५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ५ जणांचा मृत्यू झालेला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!