#Corona Effect Aurangabad News Update : औरंगाबादेतील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता , उद्यापासून सकाळी ११ ते रात्री ११ पर्यंत कडक कर्फ्यू…

औरंगाबाद शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १०३ वर गेल्यामुळे जिल्हा प्रशासनाने आता कडक पावले उचलली असून शहरातील सर्व लोक प्रतिनिधींची बैठक बोलावून त्यांना कोरोनाचे गांभीर्य समजावून सांगत उद्या दि. २९ पासून ते ३ मे पर्यंत पुन्हा कडक कर्फ्यू चे आदेश देण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी आज जारी केलेल्या नव्या आदेशानुसार सकाळी ११ ते रात्री ११पर्यंत अत्यंत कडक कर्फ्यू राहील कळविले आहे. विशेष म्हणजे दि . २३ रोजी दिलेल्या आदेशानुसार रमजान निमित्त मुस्लिम बांधवांना दिलेली सायंकाळी ५ ते ७.३० वाजेपर्यंतची सवलतही मागे घेण्यात आली असून सकाळी ११ वाजेपर्यंतच आता सर्वणी आपली काय खरेदी करायची ती सोशल डिस्टंसिंगचे पालन करून करावी लागणार आहे.
औरंगाबाद शहराचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी आज जारी केलेल्या आदेशानुसार फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) प्रमाणे शहरातील नागरिकांना मनाई आदेश दिला आहे. या आदेशात पोलीस आयुक्तांनी म्हटले आहे की औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या वैद्यकीय व तत्सम अत्यावश्यक सेवा आस्थापनासह केवळ मान्यता असणाऱ्या सेवा वगळता सर्व प्रकारच्या अस्थापना बंद राहतील सदर चा आदेश दिनांक २९ एप्रिल २०२० ते ०३ मे पर्यंत दररोजसकाळी ११ ते रात्री ११ वाजेच्या दरम्यान लागू करीत आहे सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध साथरोग अधिनियम कायदा 2005 व भारतीय दंडविधान प्रमाणे कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.