Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad NewsUpdate : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा मुख्यमंत्री निधीसाठी एक कोटी देण्याचा प्रस्ताव

Spread the love

उसाचं शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या आवाहनाला प्रतिसाद ।  आपत्कालीन निधीतून मदतीचा व्यवस्थापन परिषदेत प्रस्ताव मंजूर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक कोटीची रक्कम देण्याचा प्रस्ताव व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत सर्वांनुमते मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांनी दिली. विद्यापीठाच्या आपत्कालीन निधीतून सदर रक्कम देण्यात येणार आहे.


सामाजिक बांधिलकी जोपासणार : कुलगुरू

कुलगुरु डॉ.प्रमोद येवले म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हिडीओ कॉन्फरन्सलच्या माध्यमातून बैठका घेण्यात येत आहेत. या काळात विविध उपाय योजना करणे गरजेचे असून विद्यापीठातील सर्व घटक काम करीत आहेत, विद्यापीठाचे काम केवळ परीक्षा व निकाल एवढेच मर्यादित नाही. तर कोविड १९ नंतरणच्या परिस्थितीत विद्यापीठ समाजक बांधिलकीच्या भूमिकेतून काम करेल. मास्क निर्मिती, व्हेंटिलेटर व सॅनिटायझर डिस्पेंसर निर्मिती तसेच विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे. व्यवस्थापन परिषदेसह सर्व अधिकार मंडळांचे सदस्य, प्राध्यापक कर्मचारी यांचे सहकार्य मिळत आहे, असेही कुलगुरू म्हणाले.


‘कोरोना’च्या साथीमुळे उदभवलेली परिस्थिती चिंताजनक असून या संदर्भात राज्यातील सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांनी मुख्यमंत्री निधीसाठी निधी द्यावा, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री  उदय सामंत यांनी केले होते. यानुसार विद्यापीठातील सर्व संवैधानिक अधिकारी, प्राध्यापक व कर्मचारी यांनी यापूर्वीच एकदिवसाचे वेतन १७ लाख ५५ हजार रुपये मुख्यमंत्री निधीत जमा केले आहेत. तर  उदय सामंत यांनी दोन दिवसांपूर्वी सर्व कुलगुरू शुक्रवारी (दि. २४) व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला होता. सर्व विद्यापीठानी तात्काली निधीतून आणखी निधी मुख्यमंत्री निधीला द्यावा, असे आवाहन केले होते. या नंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सर्व व्यवस्थापन परिषद सदस्यांशी कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांनी मंगळवारी (दि.२८) व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून तातडीची बैठक घेण्यात आली. ‘युनीक’ च्या माध्यमातून ही ‘ व्हर्चयूल बैठक घेण्यात आली. कुलगुरू डॉ प्रमोद येवले अध्यक्षस्थानी होते. यावेळी कुलगुरु डॉ प्रमोद येवले यांनी सर्व सदस्यांसमोर आपत्कालीन निधीतून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रक्कम देण्याचा प्रस्ताव मांडला. सर्वानुमते एक कोटी रुपयांची रक्कम देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. या संदर्भात २०१३ मध्ये आपत्कालीन व्य्वसाठपण निधी खर्च करण्याबद्दल असलेल्या शासन निर्णयाच्या अधीन राहूनप्रस्ताव मंजूर करण्यात आला.या संदर्भात शासनाचे आदेश प्राप्त होताच निधी जमा करण्यात येणार आहे. बैठकीस प्रकुलगुरू डॉ प्रवीण वक्ते, कुलसचिव डॉ . जयश्री सूर्यवंशी आदींसह सदस्य सहभागी झाले . यावेळी राज्यपाल नियुक्त सदस्प किशोर शितोळे, ज्येष्ठ व्यवस्थापन परिषद सदस्य संजय निंबाळकर, डॉ राहुल मस्के, प्राचार्य डॉ जयसिंगराव देशमुख, डॉ. हरिदास विधाते, डॉ फुलचंद सलामपुरे, डॉ . राजेश करपे, प्रा सुनील निकम , डॉ शरफूण निहार, सहसंचालक डॉ डी के गायकवाड, निमंत्रित सदस्य राजेंद्र मडके, डॉ गणेश मंझा आदींनी सहभाग घेतला .सुमारे दोन तास सदर बैठक चालली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!