Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabd : माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या आई त्यांच्या पत्नीच्या विरोधात का गेल्या पोलिसात ? काय आहे प्रकरण ?

Spread the love

मनसेचे नेते माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा कौटुंबिक वाद आता पोलिसात गेला असून हर्षवर्धन जाधव यांच्या आईने सुनेविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तेजस्विनी जाधव यांनी सून संजना जाधव यांच्यावर शिवीगाळ आणि छळ केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी क्रांती चौक पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली आहे.हर्षवर्धन जाधव यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीचा  गुन्हा दाखल करण्यात आला आहे . केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीच आपल्या मुलाविरुद्ध ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करायला लावल्याचा आरोप तेजस्विनी जाधव यांनी केला होता. हेच या वादाचं मूळ कारण सांगण्यात येत आहे. आपल्या वडिलांवर आरोप केल्याने संजना जाधव या चांगल्याच संतापल्या आहेत. यावरून त्यांनी तेजस्विनी जाधव आणि संजना जाधव यांच्यात तूतू-मैमै सुरु आहे. आता हा वाद विकोपाला गेला असून थेट पोलिस स्टेशनमध्ये पोहोचला आहे.

अदालत रोडवरील त्यांच्या बंगल्याजवळ एका व्यक्तीला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन जाधव यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीच आपल्या मुलाविरुद्ध ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करायला लावल्याचा आरोप तेजस्विनी जाधव यांनी केला होता. आपले वडील रावसाहेब दानवे यांच्यावर करण्यात आलेला आरोप संजना जाधव यांना सहन झाला नव्हता. यावरून सासू-सुनेमध्ये वाद सुरु आहे. हर्षवर्धन जाधव यांच्या बंगल्याशेजारी शेजारी तक्रारदार  व्यक्तीची टपरी होती. ती टपरी काढण्यासाठी हर्षवर्धन जाधव यांनी जातीवाचक शिवीगाळ करत धमकी दिल्याचा आरोप आहे. त्याने याविरोधात पोलिसांकडे लेखी तक्रार देत जाधव यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर पोलिसांनी हर्षवर्धन जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अटकपूर्व जमीन मिळविण्यासाठी हर्षवर्धन जाधव न्यायालयात गेले होते परंतु त्यांना दिलासा मिळाला नाही. यावरून त्यांच्या कुटुंबात वाद चालू आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!