Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

बनावट सोने तारण कर्ज प्रकरण, आणखी तिघांवर गुन्हे

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद -१ किलो बनावट सोने तारण ठेवून ११लाख ८० हजार रु. कर्ज उचलणार्‍या आणखी तिघांवर वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल होण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरु होती.
निशांत मल्टीस्टेट काॅ आॅपरेटिव्ह बॅंकेतून सतीष बाबूराव नाईक, रा. गुरुजन हाऊसिंग सोसायटी, रोपळैकर चौक,अटकेत असलेला शरद शहाणे रा.बालाजीनगर, व रवि सूर्यकांत गायकवाड रा. गुलमोहोर काॅलनी सिडको अशी आरोपींची नावे आहेत. वरील तिघांनी अंदाजे १किलो बनावट सोने तारण ठेवून ११लाख ८० हजार रु.कर्ज उचलल्याचा गुन्हा गुन्हेशाखेने उघडकीस आणला. वरील कारवाईत पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, एपीआय मनोज शिंदे पोलिस कर्मचारी अप्पासाहैब खिल्लारी विलास वाघ यांनी सहभाग घेतला होता.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!