Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : चर्चेतली बातमी : अमोलच्या मारेकर्‍यांची गुन्हेशाखेकडूनही चौकशी, पण मृतदेह सापडल्याशिवाय कोणत्याही निर्ष्कषावर जाणे योग्य नव्हते.- सावंत

Spread the love

वर्चस्वाच्या वादातून चौघांनी पोलिस पुत्र अमोल घुगेचा खून केला. याप्रकरणातील गुन्हेगारांना सिडको पोलिस ठाण्यात अमोलच्या बेपत्ता झाल्याप्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली होती. मात्र संशयितांकडून खून केल्याची माहिती उजेडात येत नव्हती व पुरावे मिळंत नसल्यामुळे संशयितांना सोडून देण्यात आले होते. पण गुन्हे  शाखा संशयितांच्या मागावर असतांनाच सिडको पोलिसांनी त्याच संशयितांना ताब्यात घेऊन खुनाच्या गुन्ह्याला वाचा फोडली. हे सिडको पोलिसांचे यश आहे. अशी माहिती गुन्हेशाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांनी दिली.  गुन्हेशाखा असो किंवा कोणताही पोलिस ठाण्याचा वरिष्ठ अधिकारी असो तपासामधे हेतूपुरस्सर दिरंगाई करंत नसतो असेही यावेळी सावंत म्हणाले.
दरम्यान, सिडको पोलिसांचे पथक उरलेल्या दोन आरोपींच्या मागावर नागपुरच्या दिशेने रवाना झाले आहे. डॉ. चित्रा डकरे यांच्या खून प्रकरणातील पोलिस पुत्र अमोल घुगे याला ओल्या पार्टीसाठी ३१ डिसेंबर रोजी सौरव वानखेडे, गौरव वानखेडे, शुभम विसपुते व रोहित फुसे रात्री सोबत घेऊन गेले होते. त्यानंतर सिडकोतील अहिल्याबाई होळकर चौकातील उद्यानात पार्टी केली होती. पार्टी दरम्यान वाद झाल्यावर चौघांनी अमोलला मारहाण केली. त्यातच त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याचा मृतदेह पेट्रोल टाकून पेटविण्यात आला होता. मात्र, अमोलचा मृतदेह अर्धवट जळाल्याने चौघांनी तो ड्रेनेजमध्ये टाकला होता. अशी माहिती सिडको पोलिसांना मिळाली होती. त्यादृष्टीने तपास सुरु होता. दरम्यान रात्री उशिरापर्यंत अमोल घरी आला नाही. म्हणून त्याची आई कुसूम घुगे यांनी १ जानेवारी रोजी सिडको पोलिसात चौघांविरुध्द तक्रार दिली होती.
…….
गुन्हे शाखेकडूनही आरोपींची चौकशी.
सिडको पोलिस अमोलच्या बेपत्ता झाल्याची नोंद होताच १ जानेवारी रोजी सायंकाळी गुन्हे शाखा पोलिसांनी गौरव वानखेडे आणि शुभम विसपुते यांना पकडले. दोघांची चौकशी केली व त्यांना सोडण्यापूर्वी पोलिस निरीक्षक सावंत यांनी गौरव आणि शुभमच्या हालचालीवर लक्ष ठेवणण्याचे आदेश कर्मचार्‍यांना दिले होते.त्याचवेळेस सिडको पोलिसही दोघांच्या हालचालींवर लक्ष ठेऊन होते. २ जानेवारीपासून सिडको पोलिसांनी दोघांवर पाळत ठेवायला सुरूवात केली. त्यानंतर ३ जानेवारी रोजी अमोलचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे सिडको पोलिसांनी लगेचच दोघांच्या मुसक्या आवळल्या  तर हत्या केल्यानंतर लगेचच सौरव व रोहित नागपूरच्या दिशेने पसार झाले होते.
……
तिघेही सीसी टिव्हीत कैद…..
अमोल घुगे, रोहित फुसे आणि सौरव वानखेडे हे तिघेही घुगेच्या घरापासून ३१ डिसेंबर रोजी रात्री सव्वा अकराच्या सुमारास पायी गेले. थोड्या अंतरावर गेल्यानंतर ते दुचाकीने उद्यानात पार्टीसाठी गेले. यावेळी अमोलच्या हातात एक काठी होती. त्याच्यासोबत सौरव गप्पा मारत जात होता. तर या दोघांच्या पुढे फुसे एकटाच होता. हा प्रकार सीसी टिव्ही कॅमेरात कैद झालेला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक अशोक गिरी करंत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!