Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Mumbai Crime : सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड येथील रेल्वे रुळांजवळ महिलेचं शिर सापडल्याने खळबळ

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबईच्या सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड येथील रेल्वे रुळांजवळ महिलेचं शिर सापडलं असल्यानं खळबळ उडाली आहे. दरम्यान विद्याविहारमध्ये पाच दिवसांपूर्वी शिर नसलेला मृतदेह आढळून आला होता. हे शिर त्या मृत महिलेचं असावं, असा पोलिसांचा अंदाज आहे. या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या लोकांनी याबाबत घाटकोपर पोलिसांना माहिती दिली होती. महिलेचा मृतदेह एका बेडशीटमध्ये गुंडाळून या ठिकाणी फेकण्यात आला होता. महिलेची अन्य ठिकाणी हत्या करून तिचा मृतदेह विद्याविहारमध्ये फेकण्यात आला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता.

Advertisements

दरम्यान पोलिसांना महिलेचा शिर नसलेला मृतदेह सापडला असला तरी, शिर आणि पाय गायब होते. तपासादरम्यान दुसऱ्या दिवशी महिलेचे पाय सापडले होते. मात्र, शिर सापडले नाही. त्यामुळं मृतदेहाची ओळख पटली नाही. या घटनेनंतर सहाव्या दिवशी पोलिसांनी माहिती मिळाली. त्यानुसार सांताक्रूझ-चेंबुर लिंक रोडजवळ शोध घेतला. त्यावेळी रेल्वे रुळांजवळ शिर आढळून आले. संशयितांनी शनिवारी रात्री उड्डाणपुलावरून महिलेचं शिर रेल्वे रुळांजवळ फेकले असावे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.

Advertisements
Advertisements

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सांताक्रूझ-चेंबूर उड्डाणपुलाखाली रेल्वे रुळांजवळ शिर आढळून आला. ज्या ठिकाणी महिलेचा मृतदेह सापडला होता, तेथून हे ठिकाण जवळच आहे. मृत महिलेचं हे शिर असावं, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. हे शीर राजावाडी रुग्णालयात ते तपासणीसाठी पाठवण्यात आले  आहे. ही महिला कोण आहे? तिची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी करण्यात येईल, असेही पोलिसांनी सांगितले. डीएनए चाचणीसाठी ते शिर पाठवण्यात येईल. ते विद्याविहारमध्ये सापडलेल्या मृत महिलेचे असावे असा अंदाज आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. गेल्या काही दिवसांत छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह सापडल्याची मुंबई उपनगरांतील ही तिसरी घटना आहे. याआधी एका पुरुषाचा आणि एका तरुणीचा मृतदेह सापडला होता. या दोन्ही घटनांतील आरोपींना अटक करण्यात आली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!