Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

रायगड किल्ल्याच्या संवर्धनाबाबत संभाजी राजेंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे नाराजी , जातीने लक्ष घालण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

Spread the love

छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि खासदार संभाजीराजे भोसले यांनी  आज (२९ डिसेंबर) राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन  रायगड किल्ल्याच्या संवर्धनाबरोबरच इतरही विषयांवर चर्चा केली. या भेटीत त्यांनी रायगड विकास निधी आणि गेल्या दोन वर्षांत झालेल्या कामांच्या गतीबदल मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली.

संभाजीराजे भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर भेटीची माहिती दिली. संभाजीराजे म्हणाले, “मागच्या सरकारनं रायगड संवर्धनासाठी ७०६ कोटी रूपये दिले. रायगड स्वराजाची राजधानी आहे. पण, तिच्या विकासासाठी निधी मंजूर होऊन दोन वर्षे झाली, तरीही गडाचे काम काहीच झालेले नाही. या कामासाठी १६.५० टक्के कमिशन दिले जाणार आहे. म्हणजे शिवभक्तांचे २३ कोटी रूपये दलालीसाठी द्यायचे का?,” असा सवाल त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्र्यांकडे  आपणास या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ती अमान्य केली. मुख्यमंत्री म्हणाले, “रायगड संवर्धानाचं काम तुम्हीच करा, हे काम तुमच्याशिवाय दुसरं कुणी करू शकणार नाही. जे लोक भ्रष्टाचारामध्ये अडकले आहेत. त्यांना बोलावून विचारणार करू, असं आश्वासनं त्यांनी मला दिलं आहे,” अशी माहिती संभाजीराजे यांनी दिली. “माझ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजापेक्षा कुणीही मोठा नाही. त्यामुळे या कामात चूक व्हायला नको. त्यांचा वंशज म्हणून माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. मी सुरूवातीपासून याविषयी आवाज उठवत आलो आहे. आजही मुख्यमंत्र्यांना भेटून माझी भूमिका त्यांना सांगितली. असंच काम होणार असेल, तर मला या जबाबदारीतून मुक्त करा,” अशी मागणीही त्यांच्याकडे केली असल्याचं संभाजीराजे म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!