Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad : नारेगावात स्मशानभूमीबाहेर शेड उभारल्याने दोन गटात वाद , पोलिसांच्या मध्यस्थीने तणाव निवळला

Spread the love

औरंगाबाद- नारेगाव येथील गोसावी समाजाच्या समशानभूमी बाहेर शेड उभारल्यावरून दोन गटात मोठा वाद उफाळला होता. पोलिसांनी मध्यस्थी करीत दोन्ही गटांची समजूत घातली. दरम्यान या प्रकरणात महापालिका उपायुक्त रविंद्र निकम यांना सिडकौ औद्योगिक पोलिस ठाण्यात आरोपींविरुध्द तक्रार देण्याचे आदेश दिलेले आहेत अशी माहिती महापौर नंदू घोडेले यांनी दिली आहे.

नारेगावात मुख्य रस्त्यावर गोसावी समाजाची स्मशान भूमी आहे तर त्या स्मशान भूमीला चिटकून एक मशीद आहे. मशीद समोर असलेले अतिक्रमण काही महिन्यापूर्वी मनपा च्या वतीने काढण्यात आले होते. आज सकाळी समशानभूमी समोर आठ ते दहा गाळे रस्त्यावर उभारण्यात येत असल्याने या शेडच्या कामाला मुस्लिम समाजातील काही स्थानिक नागरिकांनी विरोध केला. व मशिदी बाहेरील अतिक्रमण हटविण्यात आले मग स्मशानभूमी बाहेर अतिक्रमण करण्यास कसेकाय परवानगी देण्यात आली आहे ? अशी विचारणा स्थानिक करीत होते .

या वरून सकाळी वाद सुरू झाला काही क्षणातच शेकडो नागरिकांचा जमाव जमला व दोन्ही गटात हमरी-तुमरी ल सुरुवात झाली.या घटनेची माहिती प्राप्त होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही गटातील नागरिकांची समजूत घातल्या नंतर तणाव निवळला.दुपारपर्यंत या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात कुठलीही लेखी तक्रार दोन्ही गटाकडून करण्यात आली न्हवती मात्र खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात पोलिसांचा बंदोबस्ट तैनात करण्यात आला आहे.
——————–

रस्त्यावरील अतिक्रमण हटवा..

रस्त्यावरील अतिक्रमण हे भांडणाचे मूळ असून या अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे प्रशासनाने नारेगाव मुख्य रस्त्यावरील तातडीने अतिक्रमण हटवावे अशी मागणी शरीफ पठाण,भीमराव आढे, मिर्झा अय्युब बेग,मोहम्मद युनूस बेग,विकास हिवराळे, भीमराव चव्हाण यांनी केली आहे

————————–

आपलं सरकार

Click to listen highlighted text!