Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : वीटभट्टी मालका कडून मांडूळांची तस्करी, विक्रीला नेतांना ठोकल्या बेड्या

Spread the love

औरंगाबाद : वाळूज औद्यौगिक पोलिसांनी  गांडुळाची तस्करी करणाऱ्या इसमाला साजापूर फाट्यावर अटक केली. त्याच्या ताब्यातून दोन गांडूळ  व एक कार जप्त केली आहे. पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांना त्यांच्या गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की एक इसम गांडूळ जातीच्या सापाची विक्री करण्यासाठी सजापूर फाटा येथे येत आहे ह्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी एक टीम तयार करून सदर ठिकाणी पाठवली असता सजापूर फाटा येथे सापळा रचला असता एक इसम ज्याचे नाव सय्यद सईर यसदाणी वय २५ वर्ष रा.भिमनगर, दौलताबाद यांच्या कडे ५.५०,०००/-रु. किमतीचे एक मांडूळ व ४,५०,०००/-रु. किमतीचे एक गांडूळ असे एकूण  १०,००,०००/-रु. किमतीचे दोन गांडूळ आणि १,००,०००/-रु. किमतीची व्हँगनर गाडी क्र.MH-०३-z-४८५८ मिळून आल्याने त्याचा जप्ती पंचनामा करून जप्त करुन दोन्ही मांडूळ व कार ताब्यात घेण्यात आली आहे . आरोपी हा दौलताबादेत वीटभट्टी चालवत आहे. किल्ल्याच्या परिसरात दोन गांडूळ सापडल्यानंतर त्यांची विक्री करण्याकरता आपण वाळूज परिसरात नेत असल्याची कबुली आरोपीने दिली.

सदरची कामगीरी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद पोलीस उप-आयुक्त परीमंडळ १ निकेश खाटमोडे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस निरिक्षक अनिल गायकवाड पोउपनि राजेंद्र बांगर,पोलिस हवालदार वसंत शेळके,प्रकाश गायकवाड,सुधिर सोनवणे, बंडु गोरे यांनी केली

आपलं सरकार

Click to listen highlighted text!