Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad News Update : बँकमधील सायरन वाजू लागल्याने मध्यरात्री खळबळ; पोलीस, नगरसेवकांची पळापळ

Spread the love

बँकमधील एटीएम मशीनच्या सुरक्षेसाठी एटीएम सेंटर मध्ये सायरन लावल्याचे सर्वत्र पाहण्यात येत. मात्र अशा एका सायरनमुळे रात्री सर्वांना कश्या पद्धतीने मनस्ताप होऊ शकतो याचा प्रत्यय सिडको एमआयडीसी च्या आसपास राहणाऱ्या नागरिकांना आला. एन-१ परिसरातील सिंडीकेट बँकेचा सायरन गुरुवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास अचानक वाजण्याचा सुरू झाला. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.

सायरनचा आवाज आल्याने स्थानिक नगरसेवक मनोज गांगवे, विशाल गंगावणे, गणेश गांगवे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तिथे कोणीच नसल्याचे आढळून आले.
एमआयडीसी सिडको पोलीसांच्या रात्रगस्त पथकातील सहा ते सात कर्मचाऱ्यांनी देखील तातडीने सदर ठिकाणी धाव घेतली. त्यामुळे परत एकदा व्यवस्थापकाला संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सायरनच्या आवाजाचा हा प्रकार पहाटे पाच वाजेपर्यंत चालू होता.

दरम्यान रात्री दोन नंतर रक्कम काढल्यानंतर एमटीएमचे सायरन वाजतात. परंतु ते अर्ध्या मिनिटांत बंद होतात. ते बंद झाले नाहीतर त्यासाठी सुरक्षारक्षक असणे गरजेचे असते. मात्र येथे सुरक्षा रक्षक नव्हता. त्यामुळे एटीएमच्या बाहेर असणाऱ्या सुरक्षारक्षकांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!