अज्ञात ट्रकच्या धडकेने मोटारसायकस्वार तरुणांचा जागीच मृत्यू

नाशिक शहराला लागून असलेल्या शासकीय विश्रामगृहाजवळील पेठ गावातील डोंगरदेवाची माऊलीचा कार्यक्रम आटोपून कोटंबी गावाकडे परतणाऱ्या दोन युवकांचा अपघातात मृत्यू झाला आहे. दिलीप वसंत गाढवे (२२), आणि शंकर हरिश्चंद्र पोटींदे (१९) अशी मृत पावलेल्या तरुणांची नावे आहेत. दिलीप हा धोंडमाळ येथील, तर शंकर कोटंबीचा रहिवाशी आहे. हे दोघे तरूण दुचाकीने परतत असताना एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात दोघांचा मृत्यू झाला. दिवाळी पाडव्यादिवशीच ही दुर्देवी घटना घडल्याने धोंडमाळ आणि कोटंबी गावात शोककळा पसरली आहे.
दिलीप आणि शंकर दोघे रात्री ११ .३० ते १२ वाजण्याच्या सुमारास डोंगरदेवी माऊलीचा कार्यक्रम आटोपून घरी परतत असताना नाशिककहून गुजरात राज्यात जाणाऱ्या अज्ञात वाहनाने जवळपास त्यांच्या दुचाकीला धडक देत १०० ते १५० फूट फरपटत नेले. या अज्ञात वाहनाने दोन तरुणांची दुचाकी रस्त्यानजीकच्या खड्यात लोटून तो अज्ञात वाहनचालक फरार झाला.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पेठ शहरात माऊलीच्या कार्यक्रमासाठी तालुक्यातील हे दोघेही तरुण कार्यक्रम संपून आपल्या गावाकडे मोटर सायकलने आपल्या गावाकडे परतत होते. त्याच वेळी नाशिक रोडवर पेठेजवळ अज्ञात वाहनाने धडक देत त्यांना फरफटत नेते आणि खड्यात लोटून दिले. त्यावेळी दूरून जाणाऱ्या काही वाहनधारकांनी हा प्रकार पाहिला आणि गावकऱ्यांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर तातडीने हालचाली करून गावकऱ्यांनी घटनास्थळी असलेले मृतदेह उचलले . या प्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनाविरूध्द अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.