Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

अभिव्यक्ती : महाराष्ट्रात इतिहासाची पुनरावृत्ती : निद्रिस्त मराठा आणि पेशवाईचा उदय !

Spread the love


शिवरायांचा मराठा महाराष्ट्रा मधला सर्व समाज्याचे योग्य नेतृत्व करणारा मोठा भाऊ होता ! त्याच्या नेतृत्वाखालीच सर्व सुरळीत राहत होत. पेशव्यांनी त्यात खंड पाडला. हा खंड ब्रिटीशांची सत्ता संपून यशवंतराव चव्हाण येऊ पर्यंत होता. स्वतंत्र भारतात महाराष्ट्राच्या अस्मीतेन पुन्हा उचल खाल्ली आणि १९६० मध्ये महाराष्ट्र राज्य आकारास आल. जे काम नेहरूंनी देशात केल तेच काम यशवंतरावांनी महाराष्टात केल. यशवंतरावांनी या महाराष्ट्राचा सामाजिक , राजकीय, आर्थीक पाया मजबूत केला. यशवंतरावांनंतर त्यांचा समृध्द वारसा शरद पवार या युगंधर नेत्याकडे आला. पण आज सत्तेच्या भाऊ बंदकीत मश्गुल झालेल्या नेत्यांमुळे आणि निद्रिस्त मराठ्यांमुळे छत्रपतींच्या महाराष्ट्रात पुन्हा पेशवाईचा उदय होतो आहे. म्हणजेच महाराष्ट्रात इतिहासाची पुनरावृत्ती होऊ पाहत आहे. 


महाराष्ट्रातला हा काळ सन १७४९  सारखा वाटतोय ! या मातीतला मराठा जेव्हा जेव्हा निद्रिस्त झालाय तेव्हा तेव्हा पानिपत भोगाव लागलय. सन १७४९ साली जी ग्लानी मराठा समुदायाला आली होती तीच ग्लानी सध्या महाराष्ट्रात दिसत आहे. सत्तेची सुत्रे मराठा छत्रपतींच्या हातून खय्रा अर्थाने ब्राह्मण पेशव्याच्या हातात गेली ते साल म्हणजे १७४९ ! सातारच्या शाहूंचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीला नानासाहेब पेशव्याने बळजबरी सती पाठवल. नानासाहेब पेशव्याने मरणकाळी छत्रपती शाहूंकडून सत्तेचे सर्व अधीकार स्वताःकडे घेतले. मराठा समुदाय शांतपणे पाहत बसला. हे सत्तांतर अगदी शांतपणे चोरपावलाने झाले. महाराष्ट्रराज्य अलगत पेशव्यांच्या खिशात गेले ! पेशव्यांनी रासरंगात सत्ता हवी तशी हाकली आणि पानिपताच्या खोल गर्तेत नेहून प्रराक्रमी मराठ्यांना संपवलं ! त्यातून परत पुर्वीसारखी मराठ्यांची पुन्हा सत्ता उभी राहिली नाही.

“द ग्रेट मराठा महादजी शिंद्यांनी” काही प्रमाणात मराठेशाही उत्तरेत निर्मांण केली पण दक्षीणेत नाना फडणविसाने सत्तेचे सोपान हस्तगत केले. सगळे मराठे “फडणविसा़च्या” ओंजळीतून पाणी पित होते. महादजी शिंदे १७९४ मध्ये पुण्यात आले. त्यांच्या पाठीमागे मराठा समुदाय खंबिरपणे उभा नव्हता. त्यांना नाना फडविसाने विषप्रयोग करून वानवडी येथे मारून टाकलं. मराठे तरीही शांत आणि निर्वीकार भावाने पाहत राहीले.

पेशवाई मातली ! शिवरायांनी रूजवलेली समता भंग पावली. सगळे चित्र पालटले. जिथे तलवारींचा खनखनाट चालायचा तिथे नाचणाय्रा बायकांचे घुगरू “छमछम” करू लागले. शनिवारवाडा बाईलवेडा-वाडा म्हणून ओळखला जाऊ लागला. जातीपातीचा राक्षस थैमान घालू लागला ! हे झाल कारण मराठ्यांना ग्लानी आली होती ! सत्ताधिश मराठा नव्हता; पेशवे होते !!!

महाराष्ट्राच्या इतिहासातील सत्तेचा एक तेजस्वी प्रवाह आहे. तो प्रवाह छत्रपती शिवरायांपासून सुरू होतो नंतर तो प्रवाह छत्रपती संभाजी राजांपर्यंत येतो. पुढे हा प्रवाह काही अंशाने खंडीत होऊन सातारच्या छत्रपती शाहूंकडे जातो. सत्तेचा हा प्रवाह पेशवाईत खंडीत झाला असला तरी महादजी शिंद्यांच्या रूपाने काही प्रमाणात तग धरून होता. त्यानंतर या राजकिय प्रवाहात नाव घ्यावे असे दोनच नेते आहेत. एक यशवंतराव चव्हाणआणि दुसरे शरद पवार !

शिवरायांचा मराठा महाराष्ट्रा मधला सर्व समाज्याचे योग्य नेतृत्व करणारा मोठा भाऊ होता ! त्याच्या नेतृत्वाखालीच सर्व सुरळीत राहत होत. पेशव्यांनी त्यात खंड पाडला. हा खंड ब्रिटीशांची सत्ता संपून यशवंतराव चव्हाण येऊ पर्यंत होता. स्वतंत्र भारतात महाराष्ट्राच्या अस्मीतेन पुन्हा उचल खाल्ली आणि १९६० मध्ये महाराष्ट्र राज्य आकारास आल. जे काम नेहरूंनी देशात केल तेच काम यशवंतरावांनी महाराष्टात केल. यशवंतरावांनी या महाराष्ट्राचा सामाजीक, राजकीय, आर्थीक पाया मजबूत केला. यशवंतरावांनंतर त्यांचा समृध्द वारसा शरद पवार या युगंधर नेत्याकडे आला.

सध्या काही विघ्नसंतोषी लोक शरद पवार यांचे राजकिय स्थान वेग वेगवेगळ्या माध्यमातून डळमळीत करू पाहत आहेत. महाराष्ट्रातील कृतघ्न लोकांच्या चेष्टेचा विषय ते बनत असले तरी आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात त्यांचेे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहीले जाईल. महाराष्ट्राच्या पुरोगामी जडणघडणीत शरद पवारांचा वाटा सिंहाचा आहे. सध्याच्या राजकारणात हा एकमेव नेता मराठ्यांचा पर्यायाने सर्व महाराष्ट्राचा खरा नेता आहे…! राजकारणात पवार साहेबांनी घेतलेले अनेक क्रांतिकारक निर्णय महिलांना दिलेले राजकीय आरक्षण,सैन्यामध्ये महिलांचा सहभाग,मराठावाडा विद्यापीठास भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव,कृषी विद्यापीठांचा महाराष्ट्रभर विस्तार,कृषी संशोधनास चालना,शैक्षणिक व सहकाराचा पाया अधिक भक्कमपणे घातला, पिंपरी

चिंचवड,चाकण,रांजणगाव,कुरकुंभ,बारामती, औरंगाबादसह महाराष्ट्र भर औद्योगिक वसाहती निर्माण करून लाखो लोकांना रोजगार दिला,हिंजवडी,खराडी,मगरपट्टा या ठिकाणी आयटी पार्क उभे केले ज्या मुळे महाराष्ट्राची जगात नवी ओळख झाली.

१७४९ मध्ये छत्रपती शाहूंच्या मृत्यूने जी राजकिय पोकळी निर्मांण झाली होती तशीच मोठी पोकळी निर्मांण होत आहे. या सगळ्या गोष्टी नवी पेशवाई येण्याची पार्वभूमी  तयार करत आहेत.


महादजी शिंद्यांना समजायला मराठी समुदायाने जशी चूक  केली तशीच चूक  शरद पवारांबाबत सध्या महाराष्ट्रात आभासी चिञ फडणवीस सरकार करित आहे . इतिहास अश्या चुकांना क्षमा नाही करत. हा शेवटचा नेता आहे जो समग्र मराठा समुदायाचा बुलंद आवाज आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील सत्तेचा प्रवाह शरद पवारांपाशी येऊन ठेपलाय. या वेळी जर मराठा समाज निद्रिस्त झाला तर पुन्हा पेशवाईचा वरवंटा महाराष्ट्रावर फिरणार ! महाराष्ट्राचा राजकिय, आर्थीक, सामाजीक व राजकीय अधोगती होणार ,निद्रिस्त राहयचं की विरोधकांची झोप उडवायची हे महाराष्ट्राच्या हातात आहे.


शरद गोरे
(इतिहास संशोधक)
पुणे

[ महानायक ऑनलाइनच्या अभिव्यक्ती या ब्लॉग मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखातील मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. “अभिव्यक्ती ” च्या माध्यमातून आम्ही आपल्या विचारांना व्यक्त  करण्यासाठी विचारपीठ उपलब्ध करून देत आहोत. आपणही या उपक्रमात सहभागी होऊ शकता : मुख्य संपादक , महानायक ऑनलाईन ] 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!