Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : डॉक्टर पत्नी-मुलाचा छळ करणा-या पित्याविरूध्द गुन्हा दाखल

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंंंगाबाद : कौटुंबिक कलहातून व्यवसायाने डॉक्टर असलेल्या पत्नीचा आणि लहान मुलाचा छळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलाचा छळ करणाNया पित्याने मुलाकडून पत्नीविषयी अत्यंत अश्लील असे संवाद म्हणून घेत त्याचे व्हीडीओ तयार केले असल्याचे पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टाऊन सेंटर सिडको परिसरातील रहिवासी डॉक्टर अर्चना ब्रम्हानंद टाले (वय ४३) यांचा विवाह बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील ब्रम्हानंद रामराव टाले (वय ४७) यांच्यासोबत झाला होता. टाले दांम्पत्याला युवराजसिंह नावाचा एक मुलगा आहे.

Advertisements

दरम्यान, अर्चना टाले व ब्रम्हानंद टाले यांच्या कौटुंबिक कारणावरून वाद झाल्याने ब्रम्हानंद टाले यांनी आपला मुलगा युवराजसिंह याचा मानसिक छळ करण्यास सुरूवात केली. डिसेंबर २०१८ ते ७ जुन २०१९ या काळात ब्रम्हानंद टाले यांनी आपल्या मुलास मारहाण करीत त्याच्याकडून अर्चना टाले यांच्याविषयी अश्लील आणि चारित्र्यहनन करणारे संवाद म्हणून घेत त्याचे मोबाईलमध्ये व्हीडीओ चित्रीकरण केले होते.

Advertisements
Advertisements

याप्रकरणी डॉ. अर्चना टाले यांनी दिलेल्या तक्रारीवरून ब्रम्हानंद टाले यांच्याविरूध्द पत्नी व मुलाचा छळ केल्याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार एस.बी. चव्हाण करीत आहेत.

औरंगाबादेत वर्गमित्राचा तरुणीवर बलात्कार..

दरम्यान, औरंगाबादेत लग्नाचे आमिष दाखवून 20 वर्षीय तरुणीवर अनेकदा लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढेच नाही तर अश्लील फोटो फेसबुकवर पोस्ट करण्याची धमकी दिली. वाळूजमधील बजाजनगरात ही घटना घडली असून या प्रकरणी आरोपी गौरव जाधव ( वय-22, रा. सिडको, वाळूज महानगर-1) याच्याविरोधात वाळूज एमआयडीसी पोलिसांत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!