Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : कर्जाचे आमिष दाखवून कामगाराला दिड लाखांना गंडा , पॉलीसीच्या नावाखाली उकळली रक्कम 

Spread the love

घर बांधकामासाठी कर्ज देण्याचे आमिष दाखवून पॉलीसीच्या नावाखाली रक्कम भरण्याची थाप मारुन कामगाराला महिलेसह दोघांनी दिड लाखाला गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. सचिन पाटील आणि रिया सिंग अशी फसवेगिरी केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याविरुध्द एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिकलठाणा विमानतळासमोरील कासलीवाल पुर्वा इमारतीत गणेश दगडू शेटे (३२) हे कुटुंबियांसोबत राहतात. ते मोबाईलवर आॅनलाईन कर्ज देणा-या फायनान्स कंपनीचा शोध घेत होते. त्यांना १0 मे रोजी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास रिया सिंग नावाच्या तरुणीचा फोन आला. त्यावेळी तिने घर बांधण्यासाठी कर्ज हवे आहे का असा प्रश्न विचारला. त्यावर शेटे यांनी होकार दिल्यावर तिने सचिन पाटील यांचा फोन येईल असे सांगितले. त्यानंतर १३ मे रोजी सचिन पाटील याने संपर्क साधत शेटे यांना आपण बजाज फायनान्समधून बोलत आहे. तुमच्या साडेदहा लाखांच्या कर्जाची फाईल माझ्याकडे आली आहे. तिला मान्यता मिळाली आहे. मात्र, त्यासाठी तुम्हाला भारती एक्सा लाईफ इन्श्युरन्सची एक लाख पाच हजारांची वार्षिक, सहामाही किंवा तिमाही पॉलीसी भरावी लागेल. तसेच ही रक्कम दहा वर्षांपर्यंत भरणे बंधनकारक असल्याचे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेऊन १२ आणि १३ जुन रोजी शेटे यांनी प्रत्येकी २५ हजार रुपये पाटीलच्या बँक खात्यात भरले.
……..
शेटेंचा सेल्फी व्हिडीओ बनवला….
१३ जुन रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास दोन भामटे शेटेंच्या घरी गेले. त्यांनी आपण बजाज फायनान्स कंपनीतून आल्याचे सांगितले. त्यांनी यावेळी शेटेंचा एक सेल्फी व्हिडीओ बनवला. त्यांच्याकडून घराचा पत्ता व पॉलीसीबद्दली माहिती घेतली. तसेच आधार कार्ड, पॅन कार्ड, एचडीएफसी बँकेचे कोरे चेक व पॉलीसी फॉर्म भरुन घेतला.
…..
कर्जाची रक्कम मंजूर झाल्याची थाप….
पाटीलने पुन्हा फोन करुन शेटेंना कर्जाची रक्कम मंजूर झाल्याचे सांगितले. तसेच २६ जुन रोजी बँक खात्यात रक्कम जमा होईल. पण त्यासाठी टिडीएसची रक्कम म्हणून एक लाख चार हजार ४३0 रुपये भरावे लागतील असे सांगितले. त्यामुळे २0 जुन रोजी शेटेंनी ५0 हजार रुपये तर २१ जुन रोजी ५४ हजार ४३0 रुपये पाटीलच्या बँक खात्यात जमा केले.
……
फसवेगिरीचा प्रकार आला उघडकीस….
२६ जुन रोजी कर्जाची रक्कम जमा झाली नाही. म्हणून २७ जुन रोजी शेटेंनी पाटीलशी संपर्क साधला. तेव्हा त्याने कर्जाची फाईल मंजूर करायची नसेल तर भरलेली रक्कम ३0 जुनपर्यंत परत मिळेल असे सांगितले. त्यानंतर शेटेंनी त्याला बरेच फोन केले. यावेळी फाईल नामंजूर केल्याची प्रत देखील त्याला मागितली. मात्र, पाटीलने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे शेटेंनी अखेर पोलिस ठाणे गाठत रिया सिंग व पाटीलविरुध्द तक्रार दिली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे करत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!