Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

नगर- औरंगाबाद रस्त्यावर भीषण अपघात , मोठा अनर्थ टळला, २३ जखमी

Spread the love

अहमदनगर – औरंगाबाद महामार्गावर आज पहाटे भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून या एसटीमधील सात प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रवासांना एसटीमधून बाहेर काढले यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात झाल्यानंतर एसटी बसने पेट घेतल्यामुळे यात २३ प्रवासी जखमी झाले असून ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी मध्यरात्रीनंतर दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास अपघात झाला.
बसमधील सुमारे 23 प्रवासी जखमी झाले आहेत. एसटी बस चालक आणि वाहक या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर बसने जागेवर पेट घेतला. आगीत बस पूर्ण जळून खाक झाली आहे. बस औरंगाबादवरून पुण्याला जात होती. त्याच वेळी नगरवरून औरंगाबादच्या दिशेने जाणा-या ट्रकने बसला समोरून धडक दिली. ट्रकची धडक एवढी जोरात होती की परिसरात मोठा आवाज झाला. बसमधील प्रवासी अपघाताच्या वेळी झोपेत होते. त्यामुळे नेमकं काय झालं हे प्रवाशांना समजलं नाही. बस चालकाच्या शेजारील भागात असलेले प्रवासी सर्वाधिक जखमी झाले आहेत. जखमींची नावे अद्याप समजलेली नाहीत.
अहमदनगर – औरंगाबाद महामार्गावर एसटी बस औरंगाबादहून नगरकडे येत होती. ओव्हरटेक करण्याच्या नादात बस समोरुन येणाऱ्या ट्रकला धडकली ही धडक इतकी भीषण होती की या धडकेनंतर बसने पेट घेतला , या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि बसमधील प्रवासांना बसमधून खाली उतरवण्यात आले. यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. या अपघातामध्ये सात प्रवासी जखमी झाले असून जखमींना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच या अपघातामध्ये बसचालक आणि वाहक गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृत्ती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!